Rohit Pawar News: 'प्रशांत जगताप यांनी पक्ष सोडण्यामागे मोठं कारण? रोहित पवार यांचे महत्त्वाचे विधान

कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ठरवा असे पवार साहेबांनी सांगितले आहे. उद्या दुपारी जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल, असेही रोहित पवार म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rohit Pawar On PCMC Election 2026: पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीच्या या मनोमिलनावर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरु लागल्या आहेत. याबाबतच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. फक्त कार्यकर्त्यांसाठी ही निवडणूक एकत्रित लढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुण्यामध्ये ते माध्यमांशी बोलत होते. 

काय म्हणाले रोहित पवार? 

"पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहोत. चर्चा करत असताना कार्यकर्त्यांकडून अपडेट घेणे गरजेचे असते. महाविकास आघाडीकडून काही  नेत्यांसोबत चर्चा झाली त्यानंतर कार्यकर्त्यासोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी इतर कार्यकर्त्यांसोबत चर्चा केली. आम्ही कुठेही घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार नाही. आम्ही एकत्र येऊन घड्याळ आणि तुतारी अशा दोन चिन्हांवर लढणार आहोत," असं रोहित पवार यावेळी म्हणाले. 

BMC Election 2026: 'मराठी माणसा जागा हो...' ठाकरे गटात नाराजीनाट्य, आयात उमेदवाराला तिकीट दिल्याने संताप

तसेच "आम्ही केलेल्या चर्चेमध्ये आपल्याला घड्याळासोबत जावे लागेल असे सर्व कार्यकर्त्यांचे म्हणणे आले. ही लढाई कार्यकर्त्यांची आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्त्यांचे समजून घेऊन, ऐकून घेऊन त्यांच्यासाठी एकत्र लढणार आहोत. यामध्ये कोणतेही बडे नेते सहभागी नसतात," असेही त्यांनी सांगितले. 

प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामागे मोठे कारण

"प्रशांत जगताप हे चांगले पदाधिकारी होते. त्यांनी का निर्णय घेतला? कशामुळे घेतला? हे मी याठिकाणी सांगणार नाही. त्याला वेगळी कारणे आहेत, मोठी कारणे आहेत. तो चांगला कार्यकर्ता होता. जर आपण कार्यकर्ते बघितले तर काँग्रेस प्रवेशानंतर त्यांनी जी नावे सांगितली ते कार्यकर्ते येऊन सुप्रिया सुळेंना भेटून घडाळ्यासोबत जावे लागेल, असे सांगत होते.  प्रशांत जगताप यांच्या काळात असणाऱ्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला घड्याळासोबतच जावे लागेल," असे सांगितले असल्याचेही रोहित पवार म्हणाले. 

पुढे बोलताना ते म्हणाले की, "टीव्हीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले असं दाखवत असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  आणि घडाळ्याचे कार्यकर्ते एकत्रित आले आहेत ही पहिली गोष्ट. त्यांच्यासाठी ही निवडणूक योग्य पद्धतीची व्हावी. बलाढ्य शक्तीसोबत लढणे सोपे व्हावे यासाठी हा निर्णय घेतला आहे. हे महानगरपालिकेचे इलेक्शन आहे. विलीनिकरणाचा विषय नाही. महानगरपालिकेत मोठे नेते सहभागी होत नाहीत, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ठरवा असे पवार साहेबांनी सांगितले आहे. उद्या दुपारी जागा वाटपाचे चित्र स्पष्ट होईल"

BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?