जाहिरात

BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?

BMC Election 2026: जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपने आपल्या काही प्रमुख आणि युवा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

BMC Election: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटेना! भाजपकडून युतीच्या घोषणेआधी या उमेदवारांना AB फॉर्मचं वाटप?

Mumbai News: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास उरले असताना महायुतीतील जागावाटपाचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या सूचनेनुसार, भाजपने मुंबईत वर्चस्व राखत शिवसेनेला (शिंदे गट) 85 ते 87 जागांवर समाधान मानण्यास राजी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा 'मास्टरप्लॅन'

पक्षात होणारी बंडखोरी आणि नाराजी रोखण्यासाठी भाजपने यावेळी कोणतीही अधिकृत यादी प्रसिद्ध केलेली नाही. त्याऐवजी, ज्या ठिकाणी जागावाटपाचा तिढा होता किंवा जिथे बंडखोरीची भीती होती, अशा ठिकाणी अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेच्या अवघ्या अर्धा तास आधी 'बी फॉर्म' देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. यामुळे तगड्या पण नाराज उमेदवारांना इतर पक्षातून अर्ज भरण्यास वेळ मिळणार नाही.

(नक्की वाचा- TMC Election: ठाण्यात महाविकास आघाडीचा 'मास्टर प्लॅन'! अनेक चकीत करणारे निर्णय होण्याची शक्यता)

भाजपकडून कोणाला मिळाली उमेदवारी?

जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भाजपने आपल्या काही प्रमुख आणि युवा उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू केले आहे. यामध्ये किरीट सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना भाजपने उमेदवारी दिल्याचं कळतंय. तर नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देत भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन, तेजिंदर सिंग तिवाना, माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी आणि जितेंद्र पटेल यांनाही एबी फॉर्म मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

(नक्की वाचा-  Pimpri Chinchwad: 'असले धंदे खपवून घेऊ नका!' पिंपरी-चिंचवडमधील सभेत अजित पवारांचा भाजपवर थेट निशाणा)

वॉर्डनिहाय संभाव्य उमेदवार (भाजप)

  • वॉर्ड २१४ - अजय पाटील 
  • वॉर्ड २१५ - संतोष ढाले
  • वॉर्ड २१८ - स्नेहल तेंडुलकर 
  • वॉर्ड ४७ - तेजिंदर सिंग तिवाना 

जागावाटपाचे सूत्र 

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप मुंबईत साधारणपणे 140 ते 145 जागांवर लढणार असून, शिवसेना शिंदे गट 85 ते 87 जागांवर निवडणूक लढवेल. उर्वरित जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com