जाहिरात

''पानसरेंचं काय झालं माहितीये ना?"; आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला कसं धमकावलं? वाचा संपूर्ण संभाषण

MLA Sanjay Gaikwad Controversy: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडले आहेत.

''पानसरेंचं काय झालं माहितीये ना?"; आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला कसं धमकावलं? वाचा संपूर्ण संभाषण
MLA Sanjay Gaikwad Controversy:  संजय गायकवाड यांच्या कथित ऑडिओ क्लिपचे संपूर्ण संभाषण वाचा...
मुंबई:

MLA Sanjay Gaikwad Controversy:  शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडले असून यावेळी त्यांनी एका पुस्तक प्रकाशकाला थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या नावावरून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. पुस्तकाचे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अनादर करणारे आहे, असा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली.

सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत असून यामध्ये आमदार गायकवाड यांनी आंबी यांना घरात घुसून मारण्याची आणि जीभ कापण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे, आंबी यांनी वारंवार "आधी पुस्तक वाचून घ्या" अशी विनंती करूनही गायकवाड यांनी "मला पुस्तक वाचायची गरज नाही" असे म्हणत शिवराळ भाषा वापरणे सुरूच ठेवले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

संजय गायकवाड आणि प्रशांत आंबी यांचे संभाषण आता व्हायरल झाले आहे. या ऑडिओ क्लिपची पुष्टी NDTV मराठी करत नाही. हे व्हायरल संभाषण आम्ही तुम्हाला देत आहोत.

वाचा संपूर्ण व्हायरल संभाषण


 गायकवाड - 
शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी
महाराजांना एकेरी बोलता का?

आंबी - 
ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. ते एकेरी नाही आहे

गायकवाड - 
अरे गोविंद पानसरे कोण होता? XXXX
शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा

आंबी - 
तुम्ही माहिती घ्या तुम्हाला कळेल, कोण आहेत ते?

गायकवाड - 
काही माहिती काढायची गरज नाही. 
शिवाजी महाराज कोण आहेत मला माहिती आहे. 
तुमच्या सारखे XXXX लोक आमच्या महाराजांना एकेरी बोलतात

आंबी - 
तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा आधी

गायकवाड - 
पुस्तक वाचायची गरज नाही मला.
शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय?

आंबी- 
मी काय सांगतोय अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं. तुम्ही पुस्तक वाचा.

गायकवाड - 
तुला माहिती आहे ना पानसरेंचं काय झालं?

आंबी - 
माहिती आहे मला

गायकवाड - 
ब्राह्मण आहे का तू?

आंबी - 
मी ब्राह्मण नाही आहे

गायकवाड - 
तुला असं कुणी लिहायला सांगितलं? शिवाजी कोण होता म्हणून

आंबी - 
मी लेखक नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. 

गायकवाड - 
तू काय जास्त शहाणपणा शिकवू नको,
लिहून घे मी आमदार संजय गायकवाड
घरात घुसुन मारेन तुला XXXXX

आंबी - 
तुम्हाला मी लेखी स्पष्टीकरण पाठवतो ते तुम्ही वाचून घ्या.

गायकवाड
ए XXXX मी धमक्या देत नाही. मी करुन दाखवतो.
मग नीट बोल माझ्याशी XXXXXX

आंबी - 
मी व्यवस्थित बोलतोय

गायकवाड - 
शिवाजी महाराज काय XXX नवरा होता

( नक्की वाचा : Raja Shivaji: रितेशच्या चित्रपटात महाराजांची युद्धनीती चुकीची दाखवली? 'वाघनखांच्या' प्रसंगाचा इतिहास काय आहे? )

आंबी - 
मी व्यवस्थित बोलतोय
तुम्ही व्यवस्थित बोला

गायकवाड - 
मी व्यवस्थित बोलतोय
तू शिवाजी लिहिलं कसं? XXXXXX

आंबी - 
तेच सांगतोय
मी व्यवस्थित बोलतोय

गायकवाड
काय सांगतो XXXX
तू राहतो कुठे XXXXX

आंबी
मी कोल्हापुरात राहतोय

गायकवाड
तुला घरात घुसून मारेन XXXXX

आंबी
मी तेच सांगतोय
मी व्यवस्थित बोलतोय
तुम्ही व्यवस्थित बोला

गायकवाड
तुझी भाषा बदल
पुस्तकाचं नाव बदल 
मग पानसरेला भेटायला वर जा

आंबी
तो अधिकार आमच्याकडे नाही
पानसरेंचं पुस्तक आहे ते

गायकवाड
XXXXX मला शिवाजी महाराज काय वाचायला
सांगतोस? माझ्या रक्ता रक्तात, कणाकणात शिवाजी महाराज

आंबी
मी काय म्हणतोय, इतकं हे करण्यापेक्षा पुस्तक वाचायचे कष्ट घ्यावा!

गायकवाड
उद्या तुला कोल्हापुरात उत्तर भेटेल सकाळी
आता बोलत नाही तुला उद्या सकाळी कोल्हापुरात उत्तर भेटेल

आंबी
काय करणार तुम्ही?

गायकवाड
तुझी XXXXXXX आहे
आणखी काही...?

आंबी
शिव्या दिल्यावर आपण बरोबर असतो असं नाही, तर वाचायचे कष्ट घ्या जरा.

गायकवाड
तू आणखी सांग काय करणार आहेस तू?

आंबी
नाही, मला ही शिव्या देता येतात, पण माझ्यावर संस्कार नाहीत शिव्या देण्याचे.

गायकवाड
अरे XXXXX! जेव्हा आपल्या महाराजांचा अपमान होतो तेव्हा आपला संयम सुटतो

आंबी
व्यवस्थित बोलायंच

गायकवाड
तू सांग आता कुठे आहे तू?

आंबी
ते सांगतोय. पण व्यवस्थित बोलायचं

गायकवाड
XXXXXX XXX XXXX
XXXXX  XXXXXXX

आणखी काय बोललास तू रे?

आंबी
व्यवस्थित बोला, शिव्या मलाही देता येतात.
वाचायचे जरा कष्ट घ्या, स्वतःला आमदार म्हणता ना?

गायकवाड
XXXXXX महाराजांचा अपमान करतोय काय तू?

आंबी
अरे बाबा व्यवस्थित बोल, मी अजूनही तुला सांगतोय, व्यवस्थित भाषेत सांगतोय.

गायकवाड
XXXXX तुम्ही आमच्या महाराजांचा अपमान करतोस काय तू?

आंबी
वाचायचे जरा कष्ट घ्या

गायकवाड
XXXXXXX   XXXXXX तुम्ही आमच्या महाराजांना बदनाम करुन टाकलं XXX XXXXX

आंबी
वाचायचे जरा कष्ट घ्या

गायकवाड
वाचताना पहिले नाव टाक नाव !

आंबी
शिव्या दिल्याने माणूस बरोबर होत नाही, वाचायचे कष्ट घ्या

गायकवाड
शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही बदनाम करुन टाकला XXXXX हो

आंबी
ते जरासं वाच जरा

गायकवाड
XXX XXXXX XXXX

कुठल्याही पत्रकाराला दे , कुठे करायचं तिथे पब्लिश कर

आंबी
ते बघूया आपण कुठे पब्लिश करायंच ते

गायकवाड
तू ये उद्या तुला कसा चिरडून टाकतो बघ

आंबी
हा, या या, बघूया.

गायकवाड
संजय गायकवाड कोण आहे
महाराष्ट्रातला आमदार जरा चेक कर

आंबी
कोण आहे?

गायकवाड
चेक कर तू, फेसबूक कर, युट्यूब कर,
कळेल तुला काय आहे ते

आंबी
डॉन आहे का मोठा?

गायकवाड
तुला समजेल काय आहे ते
तू आमच्या महाराजांचा अपमान करतो

आंबी
तुला सांगितलं ना! तू जसा प्रेम करतोस तसं आम्हीही शिवाजी महाराजांवर प्रेम करतो.

गायकवाड
इथे लिहिलंय कसं पण?

आंबी
अरे तो एकेरी उल्लेख नाही आहे. त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या

गायकवाड
'शिवाजी कोण होता' हा उल्लेख एकेरी नाही का?

आंबी
आपण आईला आई म्हणतो ते काही आईचा अनादर नसतो आपल्याला

गायकवाड
ए छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिही ना मग

आंबी
मग तेच सांगतोय त्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की असं असं आहे म्हणून, की असे काही आक्षेपार्ह आहे का

गायकवाड
आम्हाला तो विषय नाही ए XXXXX हेडिंग काय आहे

आंबी
हा... मग ते हेडिंग आहे ना... ते शीर्षक आहे पुस्तकाचं... उद्गार नाही आहे

गायकवाड
तू ठरव XXX शिर्षक वगैरे काही नाही

आंबी
मग कोण तुम्ही ठरवणार का? अनादर केलाय

गायकवाड
XXXX XXXX XXX

आंबी
हा ते पण म्हणजे, तेवढी बुद्धी चालत नाही वाटतं, लेखक पानसरे आहेत. एवढं सुद्धा कळलेलं नाही

गायकवाड
तुझी कोणती बुद्धी मती मारली होती महाराजांचं नाव एकेरी घेताना?
मला शहाणपण शिकवून राहिला
अरे सगळं वाचलंय मी. शिकवून राहिला मला

आंबी
शहाणपणा नाही शिकवत,
वाचायचे जरा कष्ट घ्या

गायकवाड
हा?

आंबी
किती पानांचं पुस्तक आहे?

गायकवाड
हा?

आंबी
किती पानांचं पुस्तक आहे?

गायकवाड
पुस्तक किती पानांचं आहे रे XXXX
हा XXXX 65 पानांचं पुस्तक आहे.
62 पानांचं पुस्तक

आंबी
काही तरी एक ठरवा

गायकवाड
बरोबर आहे की नाही
62 पानांचं पुस्तक?

आंबी
एक काय ते ठरवा आणि वाचा ते

गायकवाड
नाय तू सांग ना आता

आंबी 
ते आहे ना आता हातात

गायकवाड
तू म्हणाला ना 
किती पानाचं आहे
62 पानांचं म्हटलं ना तुला मी

आंबी
मग तेच 62 पानांचं पुस्तक आहे ना,
तर एक तास दीड तास लागतात, ते वाचा

गायकवाड
ए मला काय सांगू नको टाईम किती लागतो. 
शिवाजी कोण होता कसं काय लिहलं याच्यावर

आंबी
मी परत एकदा सांगतोय, मी लेखक नाही या पुस्तकाचा

गायकवाड
मग तू काय दलाल आहे का? दलाल आहे का तू? 
दलाल आहेस पुस्तक वाटणारा

XXXXX XXX XX XXX

आंबी
अरे बाबा हेच संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोस?

गायकवाड
काय संस्कार शिकवतो रे XXXXX XXX XX XXX

आंबी
तेच सांगतोय, व्यवस्थित जरा, बोलायचं जरा

गायकवाड
तुला मी येऊन भेटणार, तुझ्या गावात भेटणार,
तुझ्या घरी भेटणार, तूझी XXXXXX

आंबी
राजन नगर झोपडपट्टीत राहतो मी. 
मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देता येतात पण मी देणार नाही

गायकवाड
ए, तुझी जीभ कापून टाकेन मी

आंबी
बरं बरं, बघुया की ! या उद्या जीभ कापायला

गायकवाड
येतोय मी थांब जरा तू

आंबी
या या, उद्या या 

गायकवाड
थांब जरा आता रोज तूझी XX XXXX
XXX XXXX थांब जरा तूझा नंबर देतो

आंबी 
बरं बरं, या बघूया

गायकवाड
काय बघतो रे XXXX

आंबी
बघूया

गायकवाड
काय बघतो तुझ्या XXX XX
उद्या काय बघतो तू?

आंबी
बघूया बघूया उद्या काय ते , ते आहेत का नाही
उद्या बघूया आपण

गायकवाड
तुला हाणतोच XXXX थांब जरा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com