Mobile Blast Viral Video: आजच्या डिजिटल युगात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. लहान मुलेही हल्ली तासनतास मोबाईल पाहत बसतात पण हेच स्मार्टफोन कधीकधी धोकादायक ठरू शकतात, विशेषतः जेव्हा आपण त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो. सध्या असाच एक हृदयद्रावक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, जो पाहून प्रत्येकजण हादरून गेला आहे. या व्हिडिओमधील एका निष्पाप लहान मुलीसोबत घडलेल्या घटनेने लोकांच्या मनात धडकी भरवली आहे आणि पालकांमध्ये चिंता निर्माण केली आहे.
Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना वाटल्या चक्क आलिशान ऑडी कार, 'हा' दिलदार बॉस कोण?
नेमकं काय घडलं?
सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामधील काही व्हिडिओ इतके भयंकर असतात की पाहणाऱ्यांच्याही काळजाचा ठोका चुकतो. सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये घरात मोबाईल वापरत बसलेल्या एका चिमुकलीसोबत घडलेला भयंकर प्रसंग दाखवला आहे ज्याने पाहणारेही थक्क होतात.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलगी पलंगाव र आरामात झोपून आपला मोबाईल फोन वापरताना दिसत आहे. सर्व काही सामान्य दिसत आहे, पण अचानक एक मोठा स्फोट होतो. ती मुलगी घाबरते आणि मोठ्याने रडू लागते. हे दृश्य इतके भयानक आहे की पाहणारेही हादरुन गेले. स्फोटाचा आवाज ऐकून मुलीची आई लगेच खोलीत धावत आली. तिने मोबाईल फोनला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच, त्याचा पुन्हा स्फोट झाला.
नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया
या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लहान मुलांच्या हातात मोबाईल देताना काळजी घेण्याचे आवाहन कले आहे. काही जणांनी हे खूपच गंभीर असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा व्हिडिओ एआय-निर्मित असू शकतो, कारण एवढा मोठा स्फोट होऊनही आई किंवा मुलीला साधा ओरखडाही लागला नाही. एनडीटीव्ही मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी केलेली नाही.