Monsoon Session: विधीमंडळ कामकाजाचा शुक्रवारचा (28 जून) दिवस अर्थसंकल्पामुळे गाजला. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक सभागृहामध्ये सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विमा कंपन्याकडून पिक विमा योजनासंदर्भात शेतकऱ्यांना न्याय न देणे, राज्यातील पाणीटंचाई, नापिकी आणि कर्जमाफीसंदर्भात देखील विरोधक आवाज उठवताना पाहायला मिळतील. राज्यातील काही विद्यापीठांचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवले जाणार आहे. सोबतच, कृषी विभागातील महामंडळांचे देखील वार्षिक अहवाल ठेवले जातील. आमदार विविध तारांकित प्रश्नांद्वारे सरकारचे लक्ष वेधताना दिसतील.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकी झाला महत्वाचा निर्णय. महायुतीमध्ये मित्रपक्षा विषयी वाद चव्हाट्यावर आणू नका. मतभेद दूर करून एकत्र निवडणूक लढा असा आदेश भाजपच्या नेत्यांनी दिला आहे.
आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. राज्यातले सरकार जाणार आहे. ते पुन्हा सत्तेत येणार नाही. काल त्यांनी हजार रूपये वाटण्याचा कार्यक्रम केला. पण त्याने काही होणार नाही. निवडणूका डोळ्या समोर ठेवून लाडकी बहीण ही योजना आणली आहे. पण दिड हजारात कोणाचे काय होणार आहे असा प्रश्नही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चे वेळी राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचे सरकारला चिमटे. जिथे जिथे राम होता तिथे तिथे इंडिया आघाडीचा विजय झाला आहे. निकालाचा अर्थ अजूनही भाजप सरकारला समजला नाही असा हल्लाबोल जयंत पाटील यांनी केला. शिवाय नरेंद्र मोदींचे मताधिक्य कसे घटले आहे हेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातले सरकारही काही महिन्यासाठी आहे असे ते यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. अर्थसंकल्पाला अजूनही सभागृहाची मंजूरी मिळाली नाही. तरही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत घोषणा करून त्याचा जीआर दाखवणे हा हक्कभंग असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत. त्यामुळे हा हक्कभंग मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला सुरूवात झाली आहे. भाजप आमदार प्रविण दरेकर राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत आहेत.
सरकारला आता तिर्थ यात्रेवर पाठवण्याची वेळ आली आहे. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर सरकारची मानसिकता ढासळली आहे. अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवली आहेत. त्यांना राज्य सरकार नोकरी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली आहे. तसा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. खेळाडूचे शिक्षण बघून त्यांना त्या पद्धतीची नोकरी दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत 'मुख्यमंत्री तिर्थ दर्शन' योजनेची घोषणा केली आहे. जेष्ठ नागरीकांसाठी ही योजना असणार आहे. सर्वांसाठी ही सरसकट योजना असणार नाही. त्यासाठी धोरण ठरवले जाईल. या योजने अंतर्गत दर वर्षी पाच ते दहा हजार जणांना तिर्थ दर्शन घडवले जाईल.
मी जे बोलतो ते करतो. आम्ही योजना केल्या. आता तुमचे फेक नरेटिव्ह चालणार नाही. तुम्ही ऐवढे सर्व केले पण मोदींना पंतप्रधानपदापासून रोखले का? हरलात तरी जिंकल्या सारखे का वागता. पेढे कशासाठी वाटता? असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे. मी खोटं बोलत नाही. मी जे करतो ते लपूनछपून करत नाही. दोन वर्षापूर्वी तुमची जागा तुम्हाला दाखवली असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांवर केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर विधानसभेत जोरदार हल्लाबोल. विधानसभेत जोरदार गोंधळ. अर्थ संकल्पानंतर विरोधक गॅसवर गेलेत असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले. लोकसभा खोटा प्रचार करून जिंकल्या. तर त्यांना वाटत आहे विधानसभा पण अशा जिंकू. पण कालच्या अर्थसंकल्पानंतर विरोधकांचे चेहरे पडले आहेत. असे वक्तव्यही एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
शक्तिपीठ महामार्गावरून विधान परिषदेत जोरदार गोंधळ झाला आहे. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जनतेची मागणी नसतानाही हा महामार्ग कशासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. हा रस्ता रद्द करावा ही मागणी त्यांनी केली. एका ठेकेदाराला खूश करण्यासाठी हा रस्ता केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. यावरून सभागृहात गोंधळ झाला. मंत्री दादा भूसे यांना याचे अपेक्षित उत्तर देता आले नाही. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले. यावेळी सभागृहात गदारोळ झाला. शेवटी उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना विधान भवनात काही महिला राखी बांधणार आहेत. राखी बाधून त्या मुख्यमंत्र्यांचे धन्यावाद मानणार आहेत.
विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनिषा कायंदे आणि शिवसेना ठाकरे गटाते अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली. अनधिकृत बॅनर्सवरून या दोघांमध्ये विधान परिषदेत वाद झाला. उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला.
नीट पेपर फुटीचा मुद्दा विधानसभेत गाजला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला. पेपर फुटीला जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवी करावी अशी मागणी या दोघांनी केली. शिवाय पेपर फुटी विरोधात एक कायदा करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. त्यावर नक्कीच विचार करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
सरकारला दोन वर्ष झाले. पण या सरकारला अजूनही मंत्रिमंडळ विस्तार करता आले नाहीत. अनेक जण कोट शिवून तयार आहेत. पण हे सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार करणार नाही. - नाना पटोले आमदार काँग्रेस
विधान परिषदेच्या सभापतींची निवड एकमताने केली जावी. तशी निवड करायला आमची तयारी आहे. इथं बहुमताचा विषय नाही. हीच सगळ्यांची भावना आहे. पण सभापतींची निवडणूक लवकरात लवकर करावी - अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विधान परिषद
विधान परिषदेच्या कामकाजाला ही सुरूवात झाली आहे. विधान परिषदेत विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विधानसभेच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. आज विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे.
एक खुर्ची बारा भानगडी, असं काही नाही. आमचा एकच नेता मुख्यमंत्री होणार आहे हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे आमच्यात वाद नाही. महायुतीचा पराभव होणार आहे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे ते आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत. - जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीची रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे अशी माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. लोकसभेला जो निकाल आला तसा निकाल विधानसभेला येणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. जितेंद्र आव्हाडांनी आणली विठ्ठल रूक्मिणीची मुर्ती. अर्थ संकल्पा विरोधात विरोधक आक्रमक.
सत्ताधारी आणि विरोधक आले विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने -सामने. शिंदे गटाच्या आमदारांना भास्कर जाधव यांनी फटकारले. शिंदे गटाला पश्चाताप होत आहे .उद्धव ठाकरे यांना सोडल्याचा म्हणून ते घोषणाबाजी करत आहेत असा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केला आहे. उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अश त्यांची इच्छा आहे. असं म्हणत जाधव यांनी शिंदे गटाच्या आमदारांचे अभिनंदन केले.
महाविकास आघाडी मध्ये मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची लढाई सुरु आहे असा आशयाचा बॅनर शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांनी झळकवला आहे. 'एक आघाडी, बारा भानगडी. गाव बसा नाही, लुटेरे आग ये' असा आशय या बॅनरवर आहे
विधानभवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गटाच्या आमदारांचे आंदोलन. पायऱ्यांवर भरत गोगावले यांची जोरदार घोषणाबाजी.
भाजपला आता भीती वाटायला लागली आहे. म्हणूनच त्यांना चिंतनाची गरज आहे. असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
सतेज पाटील यांचा सरकारवर निशाणा -
घोषणांचा पाऊस पाडला आहे. पण त्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील का? हा प्रश्न आहे. वीज माफी, सौर पंप याबाबत केवळ घोषणा केल्या गेल्या आहेत. यामधे तथ्य काहीही नाही
महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस