- राहुल कुलकर्णी
महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर दुष्काळाचे सावट आणणारा 'अल निनो'चा प्रभाव संपला आहे. त्यामुळे ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जवळपास एक वर्ष जागतिक हवामानावर वर्चस्व गाजवल्यानंतर अखेरीस 'अल निनो'चे राज्य संपले आहे. यूएस हवामान संस्थांकडून गुरुवारी (13 जून) याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली. यूएसमधील नॅशनल ओशनिक अँड ॲटमो स्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, पॅसिफिक महासागरातील हवामानाची परिस्थिती सुमारे दोन महिन्यांच्या कालावधीत 'ला नीना'मध्ये बदलण्याची शक्यता आहे, याचा अर्थ असा आहे की हंगामाच्या उत्तरार्धात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये भारतात चांगल्या पावसाला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होईल.
(ट्रेडिंग न्यूज : वेळापत्रक पाहून करा प्रवास! पश्चिम रेल्वेवर शनिवारी तर मध्य-हार्बर रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक)
यूएस नॅशनल ओशनिक अँड ॲटमो स्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन नेमके काय सांगितले? जाणून घ्या...
1. जुलै-सप्टेंबरमध्ये ला नीनाची परिस्थिती विकसित होण्याची 65% शक्यता आहे.
2. मे महिन्यातील NOAAअंदाजाने जून-ऑगस्ट महिन्याच्या कालावधीत 'ला निना' स्थिती विकसित होण्याची जवळपास 50% शक्यता होती, पण तेव्हापासून ही स्थिती सुमारे 40% पर्यंत घसरली आहे.
3. ऑगस्ट महिन्यापर्यंत ला निना या हवामानाची परिस्थिती तयार होत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये चांगल्या पावसासाठी अनुकूल म्हणून मान्सून हंगामामध्ये 'ला निना' येण्याची जोरदार शक्यता आहे.
4. ला निना ही एक हवामानविषयक स्थिती आहे, ज्याची दर तीन ते सात वर्षांनी पुनरावृत्ती होत असते. ज्यामध्ये मध्य आणि पूर्व विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील पृष्ठभागावरील पाणी सामान्य पातळीच्या खाली थंड होते. वाऱ्याच्या नमुन्यांमधील बदलांमुळे जगाच्या एका मोठ्या भागावर हवामानाच्या दृष्टीकोनातून परिणाम होतात.
(ट्रेडिंग न्यूज : Rain Alert : राज्यभर शनिवारी पावसाचा जोर कसा असेल? या जिल्ह्यांना यलो अलर्ट)