Crime News: माय-लेकाची घरात घुसून हत्या, पंढरपुरातील खळबळजनक घटना

Pandharpur Crime News : पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Pandharpur Crime News : पंढरपुरातून एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे. एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले. 

(नक्की वाचा - Nalasopara News: भर रस्त्यात ट्रॅफिक पोलिसांना बाप-लेकाने चोपले, फ्री स्टाईल हाणामारीचा video viral)

लखन जगताप हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रात्री नऊच्या सुमारास लखन काम आटपून घरी आला. यानंतर घरी आई सुरेखा आणि लखन हे दोघेच होते. काही वेळाने पावणे दहा वाजता लखनचे वडील संजय जगताप हे आपल्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घरात मुलगा लखन आणि त्यांची पत्नी सुरेखा जगताप यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. 

लखन आणि सुरेखा जगताप यांची नऊ-साडेनऊच्या दरम्यान हत्याचा झाल्याचा अंदाज आहे. यावरून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित घराच्या लोकेशनवरून फोन कॉल, सीडीआर, घराच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलिसांनी एक एक पाऊल टाकून तपास सुरू ठेवला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा - Mysterious Place: जंगलात रहस्यमय गाव, चित्रविचित्र आवाजामुळे नेहमीच येतं चर्चेत, तुम्हाला माहित आहे का?)

लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कुणी केली? हत्येचं कारण काय? याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आली नाही. मात्र रात्रभर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. एकाच वेळेस आई आणि मुलाची हत्या झाल्याने पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.