जाहिरात

Mysterious Place: जंगलात रहस्यमय गाव, चित्रविचित्र आवाजामुळे नेहमीच येतं चर्चेत, तुम्हाला माहित आहे का?

या रहस्यमय जागेबद्दल सर्वात धक्कादायक दावा हा आहे की, जो व्यक्ती मंदबुद्धीचा असतो, तो येथे काही दिवस राहिल्यास हुशार बनतो.

Mysterious Place: जंगलात रहस्यमय गाव, चित्रविचित्र आवाजामुळे नेहमीच येतं चर्चेत, तुम्हाला माहित आहे का?

Mysterious Place in Russia:रशियामध्ये (Russia) एक असे गाव आहे जे आजही विज्ञानासाठी एक मोठे रहस्य बनलेले आहे. उरल पर्वतांच्या (Ural Mountains) जवळ असलेले मोल्योब्का (Molyobka) नावाचे हे गाव 'एम-ट्रायंगल' (M-Triangle) किंवा 'पर्म झोन' (Perm Zone) म्हणून प्रसिद्ध आहे. हा परिसर सुमारे 70 वर्ग मैल क्षेत्रात पसरलेला असून मॉस्कोपासून सुमारे 600 मैल दूर आहे. हे गाव काय आहे तिथं काय काय होतं हे शोधणं सायन्स समोरील एक मोठे आव्हान मानले जाते. 

रशियाचा एम-ट्रायंगल
1980च्या दशकात जेव्हा या परिसरातून विचित्र आवाज ऐकू येऊ लागले, तेव्हापासून शास्त्रज्ञ आणि रहस्यप्रेमींचे लक्ष या गावाकडे वेधले गेले. लोकांनी सांगितले की येथे कोणत्याही वाहनाशिवाय रहदारीचा आवाज ऐकू येतो. विशेष म्हणजे येथून जवळचा रस्ता 40 किलोमीटर दूर आहे. पण ही तर फक्त सुरुवात होती. त्यानंतर अनेक घटना या गावात घडत गेल्या आहेत. 

जिथे आवाज येतात, पण कोणताही रस्ता नाही
एम-ट्रायंगलमध्ये अशा घटना घडतात ज्या सामान्यतः विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. कधी ढगांमधून एक तेजस्वी प्रकाशाची किरण पृथ्वीवर येते. तर कधी घनदाट जंगलात पारदर्शक आकृत्या फिरताना दिसतात. काही लोकांनी तर येथे यूएफओ (UFO) पाहिल्याचा दावाही केला आहे.

नक्की वाचा - CIDCO News: माझ्या पसंतीचे सिडकोचे घर घेणाऱ्यांसाठी खुश खबर! घरांची किंमत 25 ते 30 टक्कांनी कमी होणार?

शास्त्रज्ञांसाठी आजही एक न उलगडलेले कोडे
या रहस्यमय जागेबद्दल सर्वात धक्कादायक दावा हा आहे की, जो व्यक्ती मंदबुद्धीचा असतो, तो येथे काही दिवस राहिल्यास हुशार बनतो. एवढेच नाही तर गंभीर आजारी लोक येथे येऊन आपोआप बरे होतात. लोकांना असे वाटते की येथे कोणतीतरी अदृश्य शक्ती अस्तित्वात आहे.

मातीचा ढिगारा देतो जगाशी कनेक्शन
सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे येथील 'कॉल बॉक्स हिल' (Call Box Hill) आहे. एम-ट्रायंगलमध्ये मोबाईल नेटवर्क कंपन्या असल्या तरी फोन काम करत नाहीत. परंतु, जसे तुम्ही एका विशिष्ट मातीच्या ढिगाऱ्यावर चढता, तसे तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कॉल करू शकता, पण ढिगाऱ्यावरून खाली उतरताच कॉल आपोआप कट होतो.

नक्की वाचा - Ujjwal Nikam: वकील ते खासदार! उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड नेमकी का झाली? 'ही' आहेत कारणं

मोल्योब्का: एक रहस्य, चमत्कार की दुसऱ्या जगाचे प्रवेशद्वार?
एम-ट्रायंगल एक रहस्य आहे. चमत्कार आहे की दुसऱ्या जगाचे प्रवेशद्वार आहे? याचे ठोस उत्तर आजपर्यंत कोणाकडेही नाही, परंतु जे लोक येथे गेले आहेत, त्यांचे असे मत आहे की ही जागा तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com