mother dairy milk price reduced : मदर डेअरीने दुधाच्या किमतीत किमतीत प्रतिलिटर दोन रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. सोबत मदर डेअरची इतर प्रोडक्टही स्वस्त झाले आहेत. नुकत्याच झालेल्या जीएसटी कपातीचा फायदा सर्वसामान्यांना देण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यामुळे मदर डेअरची सर्वच प्रोडक्टमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुधाच्या किमतीची दरकपातीचा फायदा २२ सप्टेंबरपासून ग्राहकांना दिला जाईल.
नुकत्याच झालेल्या GST कौन्सिल बैठकीनंतर दररोज लागणाऱ्या अनेक वस्तूंवर टॅक्स रेट कमी करण्यात आला आहे. यानंतर अनेक खाद्यपदार्थ आणि स्वयंपाकघरातील सामानं पाच टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आले आहेत. तर पॅकेटमधील दुधावर लावण्यात आलेल्या पाच टक्के करात घट करून शून्य करण्यात आला आहे. म्हणजे या पॅकेज दुधावर आता कोणताही कर लावला जाणार नाही. या निर्णयानंतर मदर डेअरी दुधाच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.