Muskan Ranka House Tour VIDEO: मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर. मुंबईत आपल्या हक्काचं घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण मुंबईत हक्काचे घर सोडा भाड्याने राहणेही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. बीकेसी हा मुंबईमधील सर्वात पॉश परिसर मानला जातो. अनेक सेलिब्रेटी, राजकीय नेतेमंडळी वांद्रा परिसरात राहतात, त्यामुळे या भागात घरांच्या भाड्याचे रेटही गगणाला भिडले आहेत. सध्या सोशल मीडियावर एका कंटेट क्रिएटर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती राहत असलेल्या घराचे भाडे ऐकून नेटकरीही हैराण झालेत.
2BHK फ्लॅटचे भाडे किती आहे? (high rent Mumbai)
मुंबईच्या पॉश वांद्रे परिसरात राहणारी कंटेंट क्रिएटर मुस्कान रांका सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण तिने तिच्या टूबीएचके घराचा टुर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याला इंस्टाग्रामवर १.७ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये तिने ती राहत असलेल्या फ्लॅटचे भाडे सांगितले आहे. जेव्हा तिला ती किती भाडे देते? असे विचारले तेव्हा तिने हसून सांगितले की माझ्या दोन किडनींच्या किमती एवढे... पण खरंच तिने आकडा सांगितला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला.
मुस्कानने सांगितले की, ती मेटेंनन्स सह दरमहा १११,००० इतके भाडे देते. तिचा हा फ्लॅट वांद्रेच्या प्रीमियम भागात आहे. फ्लॅटचा आतील भाग पांढऱ्या, तपकिरी आणि बेज रंगाच्या छटांनी सजवलेला आहे. तिने प्रेमाने तिच्या घराचे नाव नाव बडी भवन ठेवले आहे. हा फ्लॅट अंदाजे ६०० चौरस फूट आहे असं ती म्हटली मात्र व्हिडिओमध्ये घर मोठे आणि प्रशस्त दिसत आहे.
किंमत ऐकूण नेटकरी हैराण | (Mumbai's Expensive Rental Market Reality)
मुस्कान पूर्ण वेळ कंटेट क्रिएटर म्हणून काम करते. ती या आलिशान फ्लॅटमध्ये एकटीच राहते. मुस्कानच्या घरात दोन बेडरूम, एक किचन, एक हॉल आणि एक लहान बाल्कनी आहे.तिने घरामध्येच तिचा स्टुडिओही काढला आहे. या फ्लॅटमध्ये आल्यानंतर समाधानी वाटतं. मी त्याला माझ्या आवडीप्रमाणे सजवलं आहे, असं ती म्हणते. मात्र तिने सांगितलेले भाडे ऐकूण नेटकरी मात्र चांगलेच हैराण झालेत. सोबतच तिचे घर पाहून अनेकांनी हे भाडे योग्य असल्याचेही म्हटलं आहे.
रिअल इस्टेट अहवालांनुसार, वांद्रे पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि दक्षिण मुंबईसारख्या भागात २ बीएचकेचे भाडे ८०,००० ते १.५ लाखांपर्यंत असू शकते. होरायझन प्रॉपटेकच्या अहवालानुसार वांद्रे हे देशातील सर्वात महागड्या भाड्याच्या क्षेत्रांपैकी एक आहे. थोडक्यात मुंबईसारख्या शहरांमध्ये सामान्य लोकांसाठी घर खरेदी करणे किंवा भाड्याने घेणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. मुंबईत राहणे खरोखर महाग आहे,हेच या व्हिडिओमधून दिसत आहे.
Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी