New Amrit Bharat Trains: मुंबईकरांना आता अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घेणं आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई ते अयोध्या धाम दरम्यान एक नवी कोरी अमृत भारत ट्रेन सुरू होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ट्रेनचा शुभारंभ केला जाणार आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांना ही ट्रेन जोजेल.. मुंबई ते अयोध्या मार्गाचा प्रवास किफायतशीर, आरामदायी होणार आहे. त्याचवेळी वाराणसी ते पुण्यातल्या हडपसर या मार्गावरच्या अमृत भारत ट्रेनचंही आज उद्घाटन होणार आहे. अयोध्येला 28 तासात, वाराणसीला 30 तासांत पोहोचता येणार आहे.
Chandrapur News: चंद्रपूर हारदलं! मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर रुग्णांसोबत भयंकर घडलं; रुग्णालय सील
बनारस - पुणे रेल्वे मार्ग आणि फायदे
- काशी ते पुणे थेट प्रवास सोपा होईल.
- बनारसी रेशीम व्यापार आणि मजुरांना फायदा होईल.
- मार्गावरील प्रमुख स्थानके: प्रयागराज, झाशी, राणी कमलापती (भोपाळ), इटारसी, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, दौंड. प्रवासाला अंदाजे ३० तास लागतील.
अयोध्या - मुंबई रेल्वेचे फायदे
- राम मंदिराकडे ये-जा करणाऱ्या यात्रेकरूंसाठी सोयीस्कर.
- पूर्व उत्तर प्रदेशातील स्थलांतरित मजुरांसाठी थेट रेल्वे.
- ही रेल्वे सुलतानपूर, प्रतापगड, प्रयागराज, सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे स्थानकांवर थांबेल.
- प्रवासाला अंदाजे २८ तास लागतील. आता देशात एकूण ६४ अमृत भारत एक्सप्रेस गाड्या असतील.
अयोध्या मुंबई कुठे कुठे थांबणार?
- संध्याकाळी 4.45 वाजता
- अयोध्या धामवरुन सुटणार
- प्रयागराज जंक्शन
- रात्री 9.30 वाजता
- जबलपूर
- पहाटे 4.20 वाजता
- इटारसी
- सकाळी 8 वाजता
- भुसावळ
- दुपारी 12.30 वाजता
- नाशिक रोड
- संध्याकाळी 4.10 वाजता
- कल्याण
- संध्याकाळी 7.05 वाजता
- 29 एप्रिल
- एलटीटी, मुंबई
- रात्री 8.30 वाजता