Mumbai Best Election: बेस्ट निवडणुकीत पैशांचा पाऊस! मतदारांच्या घरी पाकिटं पोहोच, मनसेचा गंभीर आरोप

ठाकरे बंधु एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बंद पाकिटाकून पैशांचे वाटप होत आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai BEST Election 2025:दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणुकीसाठीचे मतदान आज पार पडणार आहे. ठाकरे बंधुंच्या एन्ट्रीने बेस्ट पतपेढीची ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली आहे. या निवडणुकीच्या आधी  २१ संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस पाठवल्याने खळबळ उडाली होती. अशातच आता या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप होत असल्याचा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत मोठं राजकारण सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महायुतीवर केला आहे. ठाकरे बंधु एकत्र आल्याने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून बंद पाकिटाकून पैशांचे वाटप होत आहे, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

MNS- Shivsena Alliance: ठाकरे बंधुंची 'बेस्ट' युती ठरली! 'मविआ'चं मात्र फिस्कटलं? पडद्यामागे मोठ्या घडामोडी

देशपांडे यांनी ndtv मराठीशी बोलताना सांगितलं की, “आमचे सदस्य दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी काल समृद्धी पॅनलचं पॅम्प्लेट आलं. या पॅम्प्लेटच्या आत एक इन्व्हलप ठेवण्यात आलं होतं. हा इन्व्हलप उघडल्यावर त्यामध्ये पाचशे रुपयांच्या दोन नोटा सापडल्या. म्हणजेच थेट हजार रुपये घरपोच देऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तातडीने निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे.”

देशपांडे यांनी पुढे सांगितलं की, “जर या पद्धतीने निवडणुका लढवल्या जाणार असतील तर ही लोकशाहीची थट्टा आहे. आम्ही या संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करणार आहोत. बीईएसटी पतपेढीचे सदस्य अशा गैरप्रकारांना कधीच बळी पडणार नाहीत. अशा पद्धतीने मतांची खरेदी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना योग्य धडा शिकवला जाईल.”

Advertisement

मात्र, या आरोपांवर अद्याप महायुतीकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे या प्रकरणामुळे बेस्ट पतपेढीची निवडणूक चांगलीच गाजण्याची शक्यता आहे. निवडणुकीत प्रत्यक्षात पैसे वाटप झाले का, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Political News : राहुल गांधींनी ठाकरेंना जागा दाखवल्याचा आरोप; राज-उद्धव जवळीकीमुळे आघाडीत बिघाडी?