BMC Election 2026: मुंबईतील सत्तेसाठी भाजपचा नवा डाव? 'अंबरनाथ पॅटर्न' राबवत ठाकरे- शिंदेंना देणार झटका?

अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी करणाऱ्या भाजपने अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क 'एमआयएम'सोबत (MIM) आघाडी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Municiple Corporation Election 2026: मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र मुंबईमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप कोणाला सोबत घेणार? याबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. शिवसेना शिंदे गटही महापौरपदाबाबत आग्रही असल्याची चर्चा आहे. महापौरपदासाठी दबाव टाकण्यासाठीच शिंदेंकडून हॉटेल पॉलिटिक्सची रणनिती आखल्याचेही बोलले जात आहे. अशातच आता मुंबईमध्ये भाजपकडून वेगळाच प्रयोग केला जात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजप नवा डाव टाकणार, दोन्ही शिवसेनेला धक्का देणार..?

मुंबईत भाजप अंबरनाथ आणि अकोट प्रमाणे नवीन राजकीय प्रयोग करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत सत्तेसाठी काँग्रेसशी आघाडी करणाऱ्या भाजपने अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क 'एमआयएम'सोबत (MIM) आघाडी केली. तसाच प्रयोग मुंबईत झाल्यास दोन्ही शिवसेनेची कोंडी करता येईल, अशी रणनिती भाजपकडून आखली जाण्याची शक्यता आहे.  

Municipal Corporation Election : एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार? पालिका निकालानंतर मोठा निर्णय घेण्याचे संकेत

महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसला आणि एमआयएमच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधत वेगळी राजकीय समीकरणे साकारली जावी यासाठी चर्चा सुरू असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडून आलेला संपूर्ण गट संपर्कात असल्यास सत्तेत सहभागी झाल्यास मूळ पक्षाला निलंबनाशिवाय दुसरी कोणतीही कारवाई करता येत नाही  पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही.

काँग्रेस आणि एमआयएम न भाजप सोबत जुळवून घेणे ही अभद्र युती जरी समोर दिसत असली तरी यातुन भाजपला ठाकरेंची आणि शिंदेंची ताकद कमी करण्यासाठी मदत होईल अशी शक्यताराजकीय वर्तुळात चर्चेला येत आहे.दुसरी शक्यता म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव विजयी नगरसेवक देखील संपर्कात आल्यावर ११४ संख्याबळ गाठणं सोपं होणार आहे. या सर्व परिस्थितीत भाजपकडून कोणता डाव टाकला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Advertisement

शक्यता- १

  • भाजप-८९
  • काँग्रेस-२४
  • एम आय एम-८
  • एकुण - १२१
  • मॅजिक फिगर-११४

शक्यता -२

  • भाजप- ८९
  • काँग्रेस-२४
  • राष्ट्रवादी शरद पवार-१
  • एकुण - ११४
  • मॅजिक फिगर-११४

 Raigad News: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, पोलिसांची खरडपट्टी