Bomb Threat: महाराष्ट्र विधानभवन बॉम्बने उडवण्याची धमकी! इमारत रिकामी, पोलिसांचे सर्च ऑपरेशन, मोठी खळबळ

विधिमंडळात बॉम्ब ठेवल्याचा मेल- प्राप्त झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला असून सर्व कर्मचारी गेटवर जमा झाले आहेत, तसेच सर्वांना गेटवर रोखण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

 Maharashtra Vidhan Bhavan Bomb Threat: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच एक सर्वात धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  विधिमंडळात बॉम्ब ठेवल्याचा मेल- प्राप्त झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला असून सर्व कर्मचारी गेटवर जमा झाले आहेत, तसेच सर्वांना गेटवर रोखण्यात आले आहे. या मेलच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतानाच विधानभवनाला बॉम्बने उडवण्याची धमकी आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन बॉम्बने उडवू, अशी धमकी ई-मेल द्वारे मिळाली. या धमकीच्या पार्श्वभूमीवर इमारत तात्काळ रिकामी करण्यात आली असून सर्व कर्मचारी गेटवर जमा झाले आहेत. त्याचबरोबर सर्वांना गेटवर रोखण्यात येत आहे.

Dharashiv News: धाराशिवच्या राजकारणात मोठा ट्वीस्ट! ZP अध्यक्षपदावरही शिवसेनेचा दावा, भाजपचं टेन्शन वाढलं

याबाबतची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. विधानभवनात श्वान पथकासह, बॉम्ब शोधक पथकही दाखल झाले आहे. पोलिसांकडून संपूर्ण परिसराची तपासणी केली जात आहे. ऐन अधिवेशन काळातच असा धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.