Maharashtra Politics: काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा दिल्ली दरबारी! वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोर्चेबांधणी, पडद्यामागे काय घडतंय?

नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे. अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाली आहेत

जाहिरात
Read Time: 2 mins

 मुंबई: एकीकडे राज्यात महापालिका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी काही थांबत नसल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची दिल्ली दरबारी तक्रार केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

मुंबई महापालिका (BMC Elections 2025) निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत काल काँग्रेस पक्षाची जनसभा पार पडली. मुंबई काँग्रेसतर्फे या सभेचे आयोजन करण्यात आलं होतेय काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगडी यांनी या सभेला संबोधित केले आणि आगामी पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्यासाठी तयारी देखील केली.

Dharavi Redevelopment: धारावीचा पुनर्विकास गायकवाड कुटुंबियांमुळे रखडला, माजी काँग्रेस नेत्याचा मोठा आरोप

यावेळी मुंबई काँग्रेसमधून (Mumbai Congress) आमदार असलम शेख आमदार अमीन पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नसीम खान हे या कार्यक्रमात अनुपस्थित पाहायला मिळाले. नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत हे वारंवार समोर येत आहे. अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाली आहेत.

दिल्लामध्ये पक्षश्रेष्ठींसोबत असलेल्या बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ही बैठक एका वेगळ्या कारणासाठी असली तरी मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावल जात असल्याची तक्रार देखील ते करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा गायकवाड यांच्याविरोधात संघर्ष तीव्र होणार असल्याचे दिसत आहे. 

Advertisement

BMC Election : राष्ट्रवादी आणि शिवसेनेत टाळीची चर्चा, पण काँग्रेसचं काय चाललंय? वाचा Inside Report

दुसरीकडे, मुंबई काँग्रेस मधील दोन आमदारांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.  मुंबईत काँग्रेस पक्षाचे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा काँग्रेस आमदार अस्लम शेख आणि अमीन पटेल यांनी व्यक्त केली आहे. जरी आमदारांची ही इच्छा असली तरी सगळे निर्णय दिल्ली घेणार असल्याच देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकिसाठी काँग्रेस पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे