Malad News: बकऱ्याचं काळीज, कोंबडी अन् दारु.. मालाडमधील रिधमबाबाचा भयंकर प्रताप; धक्कादायक VIDEO

एवढेच नाही तर हा बाबा ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांना मूल होण्यासाठी मदत करण्याचा दावाही करत असे.

जाहिरात
Read Time: 2 mins

ऋतिक गणकवार, मुंबई:

Malad Bhondu Baba News:  एकीकडे भोंदू बाबा खरात  प्रकरण गाजत असताना दुसरीकडे मुंबईतील मालाडमध्ये भोंदू बाबाच्या प्रतापांमुळे स्थानिक हैराण झाले आहेत. मालाडमध्ये राहणारा हा भोंदू बाबा "आपल्या अंगात रविवार आणि गुरुवार या आठवड्यातल्या दोन दिवशी  देवी येते आणि मी अनेकांच्या शरीरातील भूत उतरवतो" असं म्हणत जादूटोणा करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या बाबाचा व्हिडिओही व्हायरल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

Ashok Kharat: '...म्हणून खरातवर कारवाईचे धाडस होत नव्हते', विखे पाटलांचा खळबळजनक दावा, राजकीय कनेक्शन सांगितलं

मालाडमधील रिधम बाबाला अटक!

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  मुंबईच्या दिंडोशी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे, जो भक्तांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडे पैसे, कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू आणि सिगारेट मागत होता. हा बाबा असा दावा करायचा की देवी त्याच्यावर अवतरते. रिधम पांचाल उर्फ मॉन्टी पांचाल असे या बाबाचे नाव असून असून ते ३७ वर्षांचे आहेत. 

Advertisement

बाबा मालाडमधील एका मैदानावर गुरुवारी आणि शनिवारी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत आपला दरबार भरवत असत, जिथे पुरुष, स्त्रिया आणि मुली मोठ्या संख्येने येत असत. बाबा लोकांचे प्रत्येक आजार बरे करण्याचे मोठे दावे करायचा. एवढेच नाही तर हा बाबा ज्या स्त्रियांना मूल होत नाही त्यांना मूल होण्यासाठी मदत करण्याचा दावाही करत असे.

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! ऐन उन्हाळ्यात ओढावलं संकट; BMC मोठा निर्णय घेणार?

हे बाबा उपचारादरम्यान तोंडात सिगारेट पेटवून भूतबाधा उतरवत असत. दूरदूरचे लोक आपल्या समस्या घेऊन या बाबाकडे येत होते. या बाबाचे राजकीय संबंध असल्याचीही माहिती आहे. सध्या, दिंडोशी पोलिसांनी बाबा यांच्या विरोधात विविध कलमांखाली एफआयआर दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. बाबांविरुद्ध आणखी खटले दाखल होऊ शकतात. 

उपचाराच्या नावाखाली तो मध्यरात्री महिला आणि मुलींना बोलावून पूजा करण्याचे नाटक करायचा. चार वर्षांपूर्वी हे बाबा जिम ट्रेनर होता त्यानंतर त्याने भविष्य सांगण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे उपचाराच्या नावाखाली तो दारू, सिगारेट, कोंबडी आणि बोकडाचे काळीज मागत होता. आता या बाबाविरुद्ध तक्रार करण्यासाठी ६० हून अधिक लोक पुढे आले आहेत. दरम्यान, या बाबाने  तक्रारदाराच्या घरी माणसे पाठवून त्याला धमकावण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article