Mumbai Water Cut: El Niño च्या प्रभावामुळे यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त होत असून, मुंबईत १ मेपासून १० टक्के पाणी कपात करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पालिका प्रशासनाकडून १०% पाणी कपातीचा प्रस्ताव आयुक्तांकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांत ३३.६०% पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा ७ जुलैपर्यंत पुरेल इतका असून वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवन वाढून पाणीसाठ्यात घट होताना दिसत आहे.
'पाणीपुरवठ्याची स्थिती'
सध्या मुंबईसाठी मोडक सागर, तानसा, भातसा, वैतरणा आदी ७ धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. शहराला वर्षभरात १४.४७ लाख दशलक्ष लिटर इतके पाणी आवश्यक असते. यंदा मान्सून उशिरा येण्याची शक्यता असून त्यामुळे ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यामुळेच मुंबई शहरात पाणी कपात होण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
Amravati News: अमरावती अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट! 5 पोलीस कर्मचाऱ्यांना दणका, एसपींचा मोठा निर्णय
धरणातील पाणीसाठा (१५ एप्रिल २०२६)
- भातसा : २,३५,४३९ दशलक्ष लिटर (सर्वाधिक)
- मध्य वैतरणा : ६९,१०६
- अप्पर वैतरणा : ७७,०४५
- तानसा : ४०,८१७
- मोडक सागर : ४५,३४०
- विहार : १५,३५३
- तुळशी : ३,२७४
तीन वर्षांची तुलना (टक्के)
२०२६ : ३३.६०%
२०२५ : ३०.२४%
२०२४ : २४.५४%
CM Devendra Fadnavis: जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; राज्यातील सद्यस्थिती काय? A To Z माहिती वाचा
दरम्यान, राज्य सरकारच्या सूचनेनुसार यंदा जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे . त्यामुळे १ मेपासून कपात लागू केल्यासच मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा राखता येईल, असे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे .
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world