अवयवदानामुळे एका रुग्णाला नवजीवन मिळाल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील एका मेंदूमृत व्यक्तीचं अवयवदान करण्यात आलं. त्याचे हृदय आणि लिव्हर हे अवयव दान करण्यात आले. त्यासाठी पुण्याहून एअर अॅम्ब्युलन्सने मुंबई एअरपोर्टवर आले. मात्र संध्याकाळची वाहतूक कोंडी लक्षात घेता हे अवयव कलिना ते गिरगाव येथील रुग्णालयापर्यंत पोहोचवणं आव्हानात्मक बाब होती. मात्र मुंबई वाहतूक दलाच्या मदतीने या मार्गावर ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात आला. त्यामुळे 22 किलोमीटरचे अंतर अवघ्या 19 मिनिटात पार करता आलं आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्य कामगिरीचं कौतुक होत आहे.
अवयवदानाच्या प्रक्रियेत अवयवदात्याने एकदा अवयव काढल्यानंतर ते तीन तासांच्या आत रुग्णापर्यंत पोहोचविणे गरजेचे असतेय. त्यानंतर तातडीने अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया सुरू होते. त्यामुळे या प्रक्रियेत वेळ खूप महत्त्वाचा असतो. पुण्यातून अवयवदानातील हृदय आणि लिव्हर मुंबईतील सर एच एन रिलायन्स रुग्णालयात आणण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी मदत झाली.
नक्की वाचा - Heart Health: कार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये आहे इतका मोठा फरक, दुर्लक्ष करू नका; अन्यथा...
ग्रीन कॉरिडॉरदरम्यान संपूर्ण वाहतूक थांबवून पोलीस गाडीच्या साहाय्याने त्या गाडीस योग्य तो मार्ग तयार करून दिला जातो. या अॅम्ब्युलन्ससाठी वाहतूक कोडींपासून बराच वेळ वाचण्यात मदत होते.