Mumbai Traffic Jam : मुंबईत मोठी वाहतूक कोंडी, 2 तासांच्या प्रवासाला 4 तास; पश्चिम-पूर्व द्रुतगती मार्ग जाम

वाहतूक कोंडी पाहता नागरिकांनी रस्ते मार्गाने जाण्याऐवजी मेट्रो किंवा रेल्वेने प्रवास करणं सोईचं ठरेल.

जाहिरात
Read Time: 1 min

Mumbai Rain Traffic Jam :आज पहाटेपासून मुंबई आणि उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. परिणामी मुंबई  आणि उपनगरात अनेक ठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी (Heavy rainfall in the Mumbai disrupted traffic) झाली आहे. त्यामुळे ज्या प्रवासासाठी एक तास लागतात त्याला दुप्पट वेळ लागत असल्याच्या तकारी आहेत. 

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना बदलापूर ते वरळी असा प्रवास करण्यासाठी तब्बल 4 ते 4.15 तास लागले. ऐकवी हा प्रवास करायला 2 तास पुरेसे होतात. तुम्ही पूर्व द्रुतगती मार्गाने प्रवास करीत असाल, किंवा बोरिवली-विरार येथून मुंबईच्या दिशेने येत असाल तर मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो.  

मेट्रो किंवा रेल्वेने करा प्रवास...

वाहतूक कोंडी पाहता नागरिकांनी रस्ते मार्गाने जाण्याऐवजी मेट्रो किंवा रेल्वेने प्रवास करणं सोईचं ठरेल. अन्यथा तासन् तास वाहतूक कोंडीत अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज घराबाहेर पडणार असाल किंवा सायंकाळी परतताना शक्य असल्याने रस्ते वाहतुकीने प्रवास न करता, रेल्वे किंवा मेट्रो-मोनोने प्रवास करणं फायद्याचं राहील.