Accident News: कारचालकाचा बेशिस्तपणा! निष्पाप डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; डोक्यावरुन टँकरचं चाक गेलं

कारचालकाने आरशात न पाहता अचानक उघडलेला दरवाजा दुचाकीला धडकल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि टँकर चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Kadivali Accident: वाहतूक विभागाने वारंवार सूचना देऊनही अनेकजण वाहन चालवताना बेशिस्तपणा दाखवतात. अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे अनेकदा निष्पाप लोकांचा जीव जातो. अशीच दुर्दैवी घटना कांदिवलीमध्ये घडली असून बेशिस्त कारचालकामुळे 'डिलिव्हरी बॉय'ला आपला जीव गमवावा लागला. कारचालकाने आरशात न पाहता अचानक उघडलेला दरवाजा दुचाकीला धडकल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि टँकर चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Pune Fuel Storage: पुण्यात इंधनाचा तुटवडा? पेट्रोल- डिझेल असोसिएशनचे मोठं आवाहन; नागरिकांना सूचना

अचानक कारचा दरवाजा उघडल्याने भयंकर घडलं

समोर आलेल्या माहितीनुसार, तुवानकुमार यादव (वय २७) असे मृताचे नाव असून तो मूळचा बिहारचा होता. गेल्या १० वर्षांपासून तो मुंबईत वास्तव्यास होता आणि झोमॅटो सारख्या फूड डिलिव्हरी ॲपसाठी काम करत होता. बुधवारी सायंकाळी ७ च्या सुमारास तुवानकुमार आपली इलेक्ट्रिक दुचाकी घेऊन कांदिवली (पश्चिम) येथील न्यू लिंक रोडवरून जात होता. पेट्रोल पंपाजवळ एका कार चालकाने आपली गाडी वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने उभी केली होती.

Advertisement

डिलिव्हरी बॉयचा मृत्यू

कारमधील आफताब आलम या चालकाने मागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न घेता उजव्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला. ​नेमकी त्याच वेळी तुवानकुमारची दुचाकी तिथून जात होती. कारच्या दरवाजाची धडक बसल्याने तो रस्त्यावर पडला आणि मागून येणाऱ्या टँकरचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले.

गंभीर जखमी अवस्थेत त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान, पोलिसांनी कारचालक आफताब आलम आणि टँकरचालक अनंतराय शिवनायक यांना ताब्यात घेतले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील 'डोअरिंग' मुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 

Pune News: पुण्यात 5 नवीन पोलीस स्टेशन्सना मंजुरी; कोणत्या परिसराला होणार फायदा? पाहा यादी

Topics mentioned in this article