Local Mega Block: दोन दिवस लोकलचा खोळंबा! 45 फेऱ्या रद्द, 'या' मार्गांवर वाहतूक बंद; एक्सप्रेसवरही मोठा परिणाम

बोरीवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामांमुळे रविवारी ४५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Mega Block :  मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल सेवेवर या रविवारी देखभालीच्या कामांचा मोठा परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेवर प्रभादेवी स्थानकातील रोड ओव्हर ब्रिजच्या (ROB) गर्डर डी-लॉन्चिंगसाठी आणि बोरीवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. या तांत्रिक कामांमुळे रविवारी ४५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

लोकलचा मेगाब्लॉक

​मिळालेल्या माहितीनुसार, प्रभादेवी स्थानकावर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री १.३० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत मेजर ब्लॉक असेल. या काळात चर्चगेट ते प्रभादेवी आणि माटुंगा रोड ते माहीम दरम्यान कोणतीही उपनगरीय सेवा चालवली जाणार नाही. परिणामी, दादर आणि वांद्रे स्थानकावरूनच अनेक गाड्या शॉर्ट टर्मिनेट केल्या जातील. दुसरीकडे, बोरीवली ते भाईंदर दरम्यान मध्यरात्री १२.१५ ते पहाटे ३.४५ पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत.

Advertisement

Pune New IT Park: हिंजवडी विसरा, पुण्यात 1500 एकरांवर होणार नवीन IT पार्क; लोकेशन काय?

लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर परिणाम

लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम होणार असून ओखा-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस, एकता नगर-दादर आणि अहमदाबाद-दादर एक्सप्रेस यांसारख्या गाड्या दीड ते पावणेदोन तास रोखून धरल्या जातील. १४ मार्च रोजी प्रवास सुरू करणारी २२९४६ ओखा-मुंबई सेंट्रल एक्सप्रेस १ तास ४५ मिनिटांनी  उशिरा सुटेल. त्याचप्रमाणे, त्याच दिवशी प्रवास सुरू करणारी १२९२८ एकता नगर-दादर एक्सप्रेस १ तासाने उशिरा सुटेल. याशिवाय  १२९०२ अहमदाबाद-दादर एक्सप्रेस १ तासाने उशिरा सुटेल. त्याच दिवशी प्रवास सुरू करणारी ०९०५२ भुसावळ-दादर एक्सप्रेस ४५ मिनिटांनी उशिरा सुटेल. त्याचप्रमाणे, १५ मार्च रोजी ०५:४० वाजता प्रवास सुरू करणारी २२९५३ गुंभाई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस १५ मार्च रोजी मुंबई सेंट्रलवरून सकाळी ६:१० वाजता सुटेल, म्हणजेच ही ट्रेन ३० मिनिटांनी उशिरा सुटेल.

रविवारी हार्बर लाईनला खोळंबा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, १५ मार्च २०२६ रोजी ट्रान्स-हार्बर मार्गावर आवश्यक अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गांवर हा ब्लॉक सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत लागू असेल. ब्लॉक दरम्यान, वाशी/नेरूळ आणि ठाणे दरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा तात्पुरत्या रद्द करण्यात येतील. याव्यतिरिक्त, ठाणे ते वाशी/नेरूळ/पनवेल पर्यंतच्या डाउन-लाइन गाड्या सकाळी १०:३५ ते दुपारी ४:०७ पर्यंत रद्द करण्यात येतील आणि पनवेल/नेरूळ/वाशी ते ठाणे पर्यंतच्या अप-लाइन गाड्या सकाळी १०:२५ ते सायंकाळी ४:०९ पर्यंत रद्द करण्यात येतील.

Palghar Accident: हृदयद्रावक! 3 तरुणांचा दुर्दैवी मृत्यू, पोलिसांच्या भितीने पळताना अनर्थ घडला?