Mumbai Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी वाचा डिटेल्स

Mumbai Local Mega Block Update All Details Article: आज मध्य रेल्वे, हार्बर लाईन तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Mega Block Update: विकेंडला खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आज मध्य रेल्वे, हार्बर लाईन तसेच पश्चिम रेल्वेमार्गावरही मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची चांगलीच तारांबळ होणार आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) कर्जत यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग (Pre Non-Interlocking) कामे हाती घेतली आहेत.

मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक कसा असेल? Central Railway Megablock Details 

या कामांसाठी ११ ऑक्टोबर (शनिवार) ते १४ ऑक्टोबर (मंगळवार) २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर डे ब्लॉक (Special Traffic and Power Day Blocks) घेण्यात येणार आहे.या काळात नेरळ - कर्जत आणि कर्जत - खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. शनिवार/रविवार (११ व १२ ऑक्टोबर): कर्जत-खोपोली, खोपोली-कर्जत या दरम्यानच्या बहुतांश लोकल रद्द राहतील.  सीएसएमटी-खोपोली/कर्जत लोकल कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि नेरळ स्टेशनपर्यंतच चालविण्यात येतील. बदलापूर आणि नेरळ येथून अनेक लोकल सीएसएमटी किंवा ठाणेकरिता सुटतील.

पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक कसा असेल?| Western Line Mega Block Details

पश्चिम रेल्वेवर १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रविवार, सकाळी १०:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत बोरिवली आणि राम मंदिर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गांवर आणि राम मंदिर आणि कांदिवली स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी चार तासांचा जम्बो ब्लॉक पाळणार आहे.

ब्लॉक कालावधीत, सर्व अप जलद मार्गावरील गाड्या बोरिवली आणि अंधेरी स्थानकांदरम्यान अप धीम्या/सहाव्या मार्गावर धावतील. त्याचप्रमाणे, पाचव्या मार्गावरील सर्व गाड्या अंधेरी आणि बोरिवली स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील.  ब्लॉकमुळे, काही उपनगरीय गाड्या रद्द केल्या जातील आणि काही अंधेरी आणि बोरिवली गाड्या गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावर वळवल्या जातील. या ब्लॉकची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी वरील व्यवस्था लक्षात ठेवावी अशी विनंती आहे.

Advertisement

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर 4 दिवसांचा मेगाब्लॉक! लोकल बंद, एक्सप्रेस रद्द, वाचा सर्व डिटेल्स

हार्बर लाईनवरील मेगाब्लॉक कसा असेल? harbour line Megablock Details 

दुसरीकडे हार्बर मार्गावरही रेल्वेचा ब्लॉक असणार आहे.  हार्बर मार्गावर ब्लाक काळात कुर्ला ते वाशीदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. त्याचवेळी ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सांयकाळी ६ वाजेपर्यंत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी दिली आहे.