
Central Railway Special Traffic and Power Day Blocks: मध्य रेल्वेने (Central Railway) कर्जत यार्ड रिमॉडेलिंग कामासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग (Pre Non-Interlocking) कामे हाती घेतली आहेत. या कामांसाठी ११ ऑक्टोबर (शनिवार) ते १४ ऑक्टोबर (मंगळवार) २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर डे ब्लॉक (Special Traffic and Power Day Blocks) घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबई विभागातील मेल, एक्स्प्रेस तसेच उपनगरीय (लोकल) गाड्यांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार आहे.
ब्लॉकचा कालावधी आणि विभाग: Date and Duration of block
हा ब्लॉक पळसधरी (सहित)- भिगवण-चोक (वगळून) या विभागादरम्यान असणार आहे. शनिवारी (११ ऑक्टोबर) १२.२० वाजेपासून ते रविवारी (१२ ऑक्टोबर) १८.२० वाजेपर्यंत, तसेच सोमवारी (१३ ऑक्टोबर) ११.२० ते १४.२० वाजेपर्यंत, मंगळवारी (१४ ऑक्टोबर) ११.२० ते १४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक सुरु असेल.
ब्लॉकमुळे रद्द झालेल्या मेल/ एक्सप्रेस गाड्या| Repercussions on Mail & Express trains due to the block
रद्द झालेल्या गाड्या: शनिवारी, १२०२५/२६ प्रगती एक्स्प्रेस, १२१२३/२४ डेक्कन क्वीन, ११००८ पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, १२१२८ इंटरसिटी, २२१०६ इंद्रायणी एक्स्प्रेस (सर्व JCO ११.१०.२०२५) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी (१२.१०.२०२५): १२१२५/२६ प्रगती एक्स्प्रेस, १२१२३/२४ डेक्कन क्वीन, ११००९/१० सिंहगड एक्स्प्रेस, २२२२५/२६ वंदे भारत, २२१०५ इंद्रायणी, १२१२७ इंटरसिटी, ११००७ डेक्कन एक्स्प्रेस (सर्व JCO १२.१०.२०२५) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
कृपया लक्ष द्या! डेक्कन क्वीनसह मुंबई- पुणे मार्गावरील 5 एक्सप्रेस रद्द, लोकलही बंद; वाचा सविस्तर
2: शॉर्ट टर्मिनेशन (Pune/Lonavala पर्यंत धावणाऱ्या गाड्या
शनिवार: ११०३० कोयना एक्स्प्रेस, ११३०२ उद्यान एक्स्प्रेस (पुणेपर्यंत).
रविवार: १८५१९ विशाखापट्टणम-एलटीटी, १११४० हॉस्पेट-सीएसएमटी, १२११६ सोलापूर-सीएसएमटी (पुणेपर्यंत); १७२२१ काकीनाडा पोर्ट-एलटीटी, २२७३१ हैद्राबाद-सीएसएमटी (लोणावळ्यापर्यंत).
3. शॉर्ट ओरिजिनेशन (Pune/Lonavala येथून सुटणाऱ्या गाड्या
शनिवार: १११३९ सीएसएमटी-हॉस्पेट एक्स्प्रेस (पुण्याहून सुटणार). रविवार: १२११५ सीएसएमटी-सोलापूर, १८५२० एलटीटी-विशाखापट्टणम, ११३०१ सीएसएमटी-बंगळूरु, ११०२९ सीएसएमटी-कोल्हापूर (पुण्याहून सुटणार); १७२२२ एलटीटी-काकीनाडा पोर्ट, २२७३२ सीएसएमटी-हैद्राबाद (लोणावळ्याहून सुटणार).
४) गाड्यांचे मार्ग बदल (Diversion Of Trains):
या चार दिवसांत अनेक महत्त्वाच्या गाड्यांना पनवेल-कल्याण-कर्जत, दिवा-पनवेल-रोहा किंवा मनमाड-दौंड कॉर्ड लाइन या मार्गांवरून वळवण्यात आले आहे. यामध्ये १७६१३ पनवेल-नांदेड एक्स्प्रेस, १६३३९ सीएसएमटी-नागरकोईल एक्स्प्रेस, २०९१६ इंदूर-लिंगमपल्ली एक्स्प्रेस, १७३१७ हुबळी-दादर एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. प्रवाशांनी आपल्या गाड्यांचा सुधारित मार्ग तपासावा.
५) वेळापत्रकात बदल (Re-scheduling Of Trains):
रविवारी सीएसएमटी-नांदेड वंदे भारत (१५.३० वा), ११००८ पुणे-सीएसएमटी (१५.५७ वा) सह अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.
सोमवारी : २०८२१ पुणे-सांत्रागाची एक्स्प्रेस (१२.४० वा) पुनर्निर्धारित करण्यात आली आहे.
Mahapalika Election: महाविकास आघाडीत बिघाडी? मित्रपक्षांची वाट न पाहता काँग्रेस एक पाऊल पुढे
उपनगरीय लोकल सेवांवर परिणाम
ब्लॉकच्या संपूर्ण कालावधीत नेरळ - कर्जत आणि कर्जत - खोपोली दरम्यान लोकल सेवा उपलब्ध नसतील. शनिवार/रविवार (११ व १२ ऑक्टोबर): कर्जत-खोपोली, खोपोली-कर्जत या दरम्यानच्या बहुतांश लोकल रद्द राहतील. सीएसएमटी-खोपोली/कर्जत लोकल कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि नेरळ स्टेशनपर्यंतच चालविण्यात येतील. बदलापूर आणि नेरळ येथून अनेक लोकल सीएसएमटी किंवा ठाणेकरिता सुटतील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊनच आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world