Mumbai Local Todays Megablock Updates: दिवाळीचा (Diwali) सण तोंडावर असतानाच मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना रविवारी, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. मध्य रेल्वेने (Central Railway) पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी (Maintenance Work) मेगाब्लॉकची (Mega Block) घोषणा केली आहे. हा मेगाब्लॉक मुख्य (Main) आणि हार्बर (Harbour) या दोन्ही मार्गांवर लागू होणार असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कसा असेल हा मेगाब्लॉक? जाणून घ्या...
मध्य रेल्वेवर कुठे आणि कधी असेल मेगाब्लॉक? Central Railway Mega Block
मध्य रेल्वेवर ठाणे ते विद्याविहार दरम्यान पाचवी आणि सहावी रेल्वे लाईनवर सकाळ १०.३५ वाजल्यापासून दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकच्या वेळेत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष ट्रेन चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशी सकाळी १०:०० ते सायंकाळी ६:०० दरम्यान मुख्य लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गांनी प्रवास करू शकतात. पायाभूत सुविधांची सुरक्षा आणि सुधारणांसाठी हे काम आवश्यक असल्याने, प्रवाशांनी या काळात सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
मुंबईच्या RBL बँकेवर आता दुबईचा ताबा; 26,853 कोटी रुपयांच्या महाकाय डीलवर शिक्कामोर्तब!
हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक कुठे असेल? Harbour Line Megablock
हार्बर मार्ग (Harbour Line): याच कालावधीत सीएसएमटी (CSMT) आणि चुनाभट्टी/वांद्रे (Chunabhatti/Bandra) दरम्यान हार्बर मार्गावरही देखभालीचे काम केले जाईल. प्रवाशांच्या सोयीसाठी हार्बर मार्गावर कुर्ला आणि पनवेल दरम्यान विशेष लोकल ट्रेन चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे अनेक लांब पल्ल्याच्या अप (Up) आणि डाउन (Down) मेल/एक्स्प्रेस गाड्यांना इतर मार्गांवर वळवण्यात (Diverted) येईल, ज्यामुळे त्यांना १० ते १५ मिनिटांचा विलंब होऊ शकतो.
डायव्हर्ट होणाऱ्या डाउन ट्रेन्स (Vidya Vihar ते Thane दरम्यान):
- एलटीटी-गोरखपूर गोदान एक्स्प्रेस (11055)
- एलटीटी-जयनगर एक्स्प्रेस (11061)
- एलटीटी-तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस (16345)
- एलटीटी-काकीनाडा पोर्ट एक्स्प्रेस (17222)
या ट्रेनवरही होणार परिणाम:
- पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस (11010),
- पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन (12124)
- पटना-एलटीटी एक्स्प्रेस (13201),
- काकीनाडा-एलटीटी एक्स्प्रेस (17221),
- पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस (12126),
- नागपूर-सीएसएमटी सेवाग्राम एक्स्प्रेस (12140),
- सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस (22226)
- बनारस-एलटीटी एक्स्प्रेस (12168)
- हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (12321)
धूलिया-सीएसएमटी एक्स्प्रेस (11012)
महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक स्टेशनचे नाव... भाजपाच्या 'कॉर्पोरेट हिंदुत्वावर' काँग्रेसचा आरोप
हार्बर मार्गावरील या लोकल सेवा रद्द:
- डाउन ट्रेन्स (CSMT ते Chunabhatti/Bandra): सकाळी ११:४० ते सायंकाळी ४:४० पर्यंत रद्द.
- अप ट्रेन्स (Chunabhatti/Bandra ते CSMT): सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० पर्यंत रद्द.
- वाशी/बेलापूर/पनवेल डाउन ट्रेन्स: सकाळी ११:१६ ते सायंकाळी ४:४७ पर्यंत निलंबित.
- वांद्रे/गोरेगाव डाउन ट्रेन्स: सकाळी १०:४८ ते सायंकाळी ४:४३ पर्यंत निलंबित.
- पनवेल/बेलापूर/वाशीहून CSMT अप ट्रेन्स: सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२० पर्यंत निलंबित.
गोरेगाव/वांद्र्याहून CSMT अप ट्रेन्स: सकाळी १०:४५ ते सायंकाळी ५:१३ पर्यंत निलंबित.
पश्चिम रेल्वेकडून दिलासा...
पश्चिम रेल्वेवर मात्र 'नो मेगाब्लॉक' या दरम्यान पश्चिम रेल्वेने (Western Railway) प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर या रविवारी, १९ ऑक्टोबर रोजी कोणताही मेगाब्लॉक नसेल. दिवाळी २०२५ च्या उत्सवामुळे प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन आणि त्यांना सुलभ प्रवास मिळावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.