Local Megablock: मुंबईकरांनी लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गांवर रेल्वेचा मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द? वाचा..

या ब्लॉकचा सर्वाधिक फटका मुख्य मार्ग (Main Line) आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसणार असून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Local Megablock News:  मुंबईकरांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या प्रवासाचा चांगलाच खोळंबा होणार आहे.  रविवार दि.१२ एप्रिल २०२६ रोजी मध्य रेल्वेने अभियांत्रिकी कामकाजासाठी मेगाब्लॉकचे नियोजन केले आहे. त्यामुळे अनेक मार्गांवरील लोकल सेवा बंद राहणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील पायाभूत सुविधांची निगा राखण्यासाठी आणि तांत्रिक सुरक्षिततेसाठी रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी 'मेगाब्लॉक' घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा सर्वाधिक फटका मुख्य मार्ग (Main Line) आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांना बसणार असून अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Advertisement

Thane News: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने भाकरी फिरवली! NCP अजित पवार गटाची 100 सदस्यांची कार्यकारिणी बरखास्त

​मध्य रेल्वे : सीएसएमटी - विद्याविहार दरम्यान बदल

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०:५५ ते दुपारी ३:५५ पर्यंत ब्लॉक असेल. या काळात सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या (सकाळी १०:४८ ते दुपारी ३:४५) जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबून पुन्हा विद्याविहार येथे धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. तसेच, घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या (सकाळी १०:१९ ते दुपारी ३:५२) विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान जलद मार्गावरून धावतील.

​हार्बर मार्ग: सेवा पूर्णतः स्थगित

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे दरम्यान सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० (डाऊन मार्ग) आणि सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० (अप मार्ग) दरम्यान सेवा बंद राहतील. सीएसएमटीहून वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या (सकाळी ११:१६ ते दुपारी ४:४७) आणि वांद्रे-गोरेगावसाठी जाणाऱ्या गाड्या (सकाळी १०:४८ ते दुपारी ४:४३) रद्द करण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी पनवेल, बेलापूर, वाशी येथून सुटणाऱ्या अप गाड्या (सकाळी ९:५३ ते दुपारी ३:२०) आणि गोरेगाव-वांद्रे येथून सुटणाऱ्या गाड्या (सकाळी १०:४५ ते संध्याकाळी ५:१३) देखील उपलब्ध नसतील.

नक्की वाचा >> CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..

Topics mentioned in this article