जाहिरात

CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..

अंबरनाथमध्ये एक भयंकर घटना घडल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा रस्ता क्रॉस करताना एका दुचाकी चालकासोबत वाद झाला. त्यानंतर असं काही घडलं..

CCTV Video: अंबरनाथमध्ये रस्ता क्रॉस करण्यावरून मोठा वाद, दुचाकीस्वाराने विद्यार्थ्याला फरफटत नेलं अन् घडलं..
Ambarnath Bike Rider Video Viral
मुंबई:

Ambarnath CCTV Video Viral : अंबरनाथमध्ये एक भयंकर घटना घडल्याने लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.  एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा रस्ता क्रॉस करताना एका दुचाकी चालकासोबत वाद झाला. दुचाकी चालकाने विद्यार्थ्याला शिवीगाळ सुरू केली. विद्यार्थ्याने जाब विचारल्याने दुचाकी चालकाने त्याला फरफट नेले. प्रचित दुबे  असं या विद्यार्थ्याचां नाव असून तो या घटनेत जखमी झाला आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलीस पुढील तपास करत आहेत.  

भर दुपारी घडलेली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

भर दुपारी घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास करत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी चालकाने एका कॉलेज तरुणाला काही अंतरापर्यंत फरपटत नेल्याची धक्कादायक घटना घडली.  

नक्की वाचा >> Badlapur News: बदलापूर शहरातील विकासकामे ठप्प, ठेकेदारांचं कामबंद आंदोलन, नगराध्यक्ष रुचिता घोरपडे म्हणाल्या..

प्रचित दुबे कॉलेजला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पार्किंग मधून दुचाकी बाहेर काढत होता. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकी स्वाराचा त्याला धक्का लागला.

यानंतर दोघांमध्ये किरकोळ वाद निर्माण झाला होता. वाद इतका वाढला की, दुचाकीस्वाराने प्रचित दुबे या तरुणाला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. त्यामुळे प्रचित दुबेच्या पायाला दुखापत झाली. 

नक्की वाचा >> Satara news: आठवीच्या पुस्तकातून मराठ्यांचा पराक्रम हटवला! NCERT च्या निर्णयावर तीव्र संताप, वाद पेटणार?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com