MetroConnect3 App: मेट्रो 3पासून इच्छितस्थळी जाण्यासाठी बससेवा! 'या' मार्गांवर धावणार, तिकीट दर किती?

Mumbai Metro 3 Bus Service: मेट्रो स्टेशनवरून गंतव्यस्थानापर्यंतचा (Destination) प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी करणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Metro 3 MetroConnect3 App: मुंबईतील लाखो नोकरदार प्रवाशांना 'लास्ट माईल कनेक्टिव्हिटी' (Last-Mile Connectivity) उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई मेट्रो लाईन ३ (Mumbai Metro Line 3) ने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रो ३ ने प्रीमियम बस सेवा पुरवणाऱ्या 'सिटीफ्लो' (Cityflo) या कंपनीसोबत भागीदारी (Collaboration) जाहीर केली आहे. मेट्रो स्टेशनवरून गंतव्यस्थानापर्यंतचा (Destination) प्रवास अधिक सोपा आणि आरामदायी करणे, हा या भागीदारीचा मुख्य उद्देश आहे.

'सीमलेस कनेक्टिव्हिटी'वर लक्ष: मेट्रो लाईन ३ च्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती देण्यात आली असून, या उपक्रमामुळे मेट्रो आणि बस मार्गांदरम्यान 'सीमलेस कनेक्टिव्हिटी' (Seamless Connectivity) सुनिश्चित होईल, असे सांगण्यात आले आहे. या सेवेमुळे प्रवाशांना बँद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC), वरळी (Worli) आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) यांसारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांवरून प्रवास करताना जागेची खात्री (Guaranteed Seat) मिळणार आहे. 

मुंबई महापालिकेची 426 घरे कुठे आहेत ? किंमतही निश्चित झाली; फॉर्म भरण्यापूर्वी ही माहिती अवश्य वाचा

तिकीटाचे दर किती?

विशेषतः गर्दीच्या वेळेत (Peak Hours) दर १० मिनिटांनी बस उपलब्ध असणार आहेत. या सोयीसोबतच, या प्रीमियम बस सेवेचे तिकीट दरही परवडणारे ठेवण्यात आले आहेत. प्रवासाची किंमत फक्त ₹२९ पासून सुरू होणार आहे, तर मासिक पास हा 499 रुपयांचा असेल असं सांगण्यात येत आहे.  ज्यामुळे ही सेवा आरामदायक, सोयीस्कर आणि खर्चाच्या दृष्टीने योग्य ठरणार आहे.

कसा असेल मार्ग?

- बीकेसी स्थानक-बीकेसीत हा मार्ग एनएसई, जिओ गार्डन, वन बीकेसी आणि कौटुंबिक न्यायालय आदी ठिकाणांवरुन जाईल.

- वरळी- सेवा सेंच्युरी मिल्स, वन इंडिया बुल्स सेंटर, कमला मिल्स आणि पेनिन्सुला कॉर्पोरेट पार्क भागातून जाईल. 

- सीएसएमटी हा मार्ग जुना कस्टम हाऊस, लायन्स गेट, एस.पी मुखर्जी चौक, के.सी. कॉलेज आणि चर्चगेट मेट्रो स्थानकाशी जोडला जाईल. 

Raj and Uddhav Thackeray: महापालिका निवडणुका पुढे ढकलणार? ठाकरे बंधू काय म्हणाले?