Mumbai MHADA Flat Without Lottery: सपनों का शहर मुंबईमध्ये आपलंही स्वप्नातलं हक्काचं घर असावं असे प्रत्येकाला वाटते. मात्र घरांचे वाढते भाव पाहता सर्वसामान्यांना घर खरेदी करणे काही परवडणारे नाही. यासाठी म्हाडाकडून अल्पदरात घरांची विक्री होती, मात्र लॉटरी लागेल त्याचे घर असा नियम असल्याने अनेकांच्या पदरी निराशा येते. आता मात्र, मुंबईकरांना लॉटरीचं टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून लवकरच लॉटरीशिवाय घरे घेण्याची संधी देण्यात येणार आहे.
लॉटरीशिवाय मिळणार घरं
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील सुमारे १०० घरांची विक्री करण्यात येणार आहे. ही सर्व घरे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून अंतिम मंजुरीसाठी प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला असून, त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे. मंजुरी मिळताच, या घरांच्या विक्रीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल.
Nagpur MHADA Scam: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? सावधान… 150 जणांची फसवणूक, संचालक फरार
म्हाडाची ही घरे मुंबईतील दादर, पवई आणि ताडदेव अशा आलिशान आणि महत्त्वाच्या ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे लॉटरीशिवाय मुंबईतील उच्चभ्रू परिसरात घर खरेदी करण्याची संधी सामान्यांना मिळणार आहे. या घरांच्या विक्रीसाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यापूर्वी तीन वेळा लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, ग्राहकांचा या घरांना अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला.
प्रतिसाद न मिळाल्याने ही घरे तशीच पडून धुळ खात आहेत. विक्रीविना पडून राहिलेल्या या घरांच्या सुरक्षा आणि देखभालीसाठी म्हाडाला तिजोरीतून दरमहा मोठा खर्च करावा लागत आहे. तसेच, या घरांमध्ये म्हाडाचा निधी अडकून पडला आहे. या आर्थिक नुकसानीमुळेच म्हाडाने आता 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार घरांची विक्री करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
काय आहेत नियम व अटी?
ताडदेवमधील क्रिसेंट टॉवर येथे विक्री न झालेली म्हाडाची सात सर्वात महागडी घरे आहेत. या घरांना प्रतिसाद न मिळाल्याने ती प्रथम प्राधान्य योजनेत समाविष्ट असणार आहेत. यामध्ये पवई तुना येथील मध्यम व उब्ब जटातील घरांचाही समावेश असेल. ही घरेही एक ते दीड कोटींची आहेत. अॅटॉप हिलमधील अल्प उत्पन्न गटातील घरांसह अन्य धरायण यात समावेश असेल.
Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?
मात्र यात उच्च व मध्यम गटातील घरांचाच अधिक समावेश आहे. या घरांसाठी प्रथम अर्ज करून अनामत रक्कम भरेल त्याला घराचे वितरण केले जाईल. या घरांसाठी उत्पम्म गटाची मर्यादा नाही, प्राप्तिकरच्या दरासल्याची वा प्राधिकर विवरणपत्राची गरज नाही. केवळ आधारकार्ड, पॅनकार्ड आणि निवासाचा दाखला इतकीच कागदपत्रे इच्छुकांना सादर करावी लागतील,