मुंबई: मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रीज तोडकामासाठी 25 एप्रिलपासून रात्री 9 पासून बंद करण्यात आला होता. या निर्णयाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला होता, त्यासोबतच तीव्र आंदोलनही करण्यात आले होते. नागरिकांचा विरोध पाहता आता एमएमआरडीएकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील ऐतिहासिक एल्फिस्टन पूल वाहतूकसाठी सुरुच असल्याचे समोर आले आहे. तोडकामासाठी 25 एप्रिलपासून हा पूल बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर काल रात्री स्थानिकांनी जोरदार विरोध करत त्याठिकाणी तीव्र आंदोलन केले.
त्यानंतर आता आता एमएमआरडीएकडून एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूल बंद करण्याच्या निर्णयाला दोन दिवसांची स्थगिती देण्यात आली आहे. सोमवारी इथल्या स्थानिक रहिवासी्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठकीचं आश्वासन देण्यात आलं आहे. बैठकीनंतर स्थानिकांच्या मागण्या मान्य होतायत का हे बघणं महत्वाचं राहणार आहे.
दरम्यान, परळ आणि प्रभादेवीला जोडणारा नारायण 125 वर्षे जुना एलफिस्टन पूल आज रात्री नऊ वाजल्यापासून बंद करण्यात येणार आहे. वरली शिवडी एलिव्हेटेड मार्गासाठी हा पूल बंद करण्यात येणार असून नवीन डबल डेकर पूल एमएमआरडीए कडून उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिका तर्फे देण्यात आली. त्यानंतर हा पूल बंद होणार असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार असल्याने नागरिकांनी तसेच वाहन चालकांनी मोठा विरोध देखील केला होता.
त्यानुसार महापालिकेने नागरिकांकडून काही हरकती मागवल्या होत्या नागरिकांनी दिलेल्या हरकतीनुसार वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही पर्यायी मार्ग देखील वाहतूक पोलीस आणि महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत.