जाहिरात

Dhangar Reservation: धनगर आरक्षणाबाबत मोठी अपडेट! उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट, आज काय घडणार?

एसटी आरक्षण मागणीसाठी येत्या 16 मार्चपासून आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत.

Dhangar Reservation: धनगर आरक्षणाबाबत मोठी अपडेट! उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकार अलर्ट, आज काय घडणार?

लक्ष्मण सोळुंके, जालना:

Dhangar Reservation News: एकीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला असतानाच आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापण्याची शक्यता आहे. धनगर समाजाच्या एसटी आरक्षण मागणीसाठी येत्या 16 मार्चपासून आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या इशाऱ्यानंतर राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरु केल्या आहेत.

धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार

याबाबत सविस्तर माहिती अशी की,धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीवरून मुंबईत मोठी हालचाल सुरू झाली आहे. येत्या 16 मार्चपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन आणि उपोषण करण्याचा इशारा आंदोलनकर्ते दीपक बोऱ्हाडे यांनी दिला आहे. आझाद मैदानावर आंदोलनासाठी त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात परवानगीसाठी पत्रही दिले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने पावले उचलण्यात आली आहेत.

LPG Shortage: गॅसचा तुटवडा! ट्रेनमध्ये प्रवाशांना जेवण मिळणार का? रेल्वे प्रशासनानं काय सांगितलं?

सरकारकडून मोठ्या हालचाली

आझाद मैदान पोलिसांनी दीपक बोऱ्हाडे यांना पत्र पाठवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी पाच जणांच्या शिष्टमंडळासह आज सकाळच्या सत्रात विधानभवनात उपस्थित राहण्याचे  निमंत्रण दिले आहेत. धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर होणाऱ्या या बैठकीत नेमका काय निर्णय होतो आणि आंदोलनाबाबत आंदोलक पुढे कोणती भूमिका घेतात,हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com