मुंबई: महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळ म्हणजेच म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विजय चाळके यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्याह 10 ते 12 जणांवर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांच्यावर निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला दालनाबाहेर मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पुर्नविकासात गेलेल्या घराचे भाडे न मिळाल्याने निवृत्त पोलिस उपनिराक्षक व १२ इतर व्यक्ती २६ डिसेंबर रोजी म्हाडा कार्यालयात जैस्वाल यांच्या भेटीला गेले असताना हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे.
यावेळी जैस्वाल यांच्सासह सुरक्षा रक्षकांनी निवृत्त पोलिस उपनिरीक्षकाला मारहाण करत शिवीगाळ केल्याचा तक्रारदार विजय चाळके यांचा आरोप असून जैस्वाल यांनी मारहाण करत मुंबई सी पी यांना सांगून एन्काऊटर करण्याची व पेन्शन बंद करण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच जैस्वाल यांनी गळ्यातील चैन व हेडफोनही तोडल्याचा आरोप चाळके यांनी केला आहे. या प्रकरणी चाळके यांनी खेरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार खेडवाडी पोलिसांनी म्हाडाचे उपाध्यक्ष जैस्वाल व इतर 10 ते 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.