जाहिरात
This Article is From Dec 29, 2024

Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...

याकृत्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली.

Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...
पुणे:

पुण्यात नक्की चाललंय तरी काय? अशी विचारण्याची वेळ आली आहे. एका मागून एक अशा घटना घडत आहे की विद्येच्या माहेर घरात हे काय सुरू आहे असा प्रश्न पडला आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना पुण्यात दिवसेंदिवस वाढत असताना आता अशी एक अत्याचाराची घटना समोर आली आहे, त्यामुळे सर्वच जण चक्रावून गेले आहे. शिवाय सर्वांना धक्काही बसला आहे. विशेष म्हणजे ही घटना एका नामांकीत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडली आहे. इथं एका 27 वर्षाच्या शिक्षिकेने 10 वीत शिकणाऱ्या 17 वर्षाच्या अल्पवयीन विद्यार्थ्याबरोबर असं कृत्य केलं ज्यामुळे सर्व जण हादरून गेले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा धक्कादायक प्रकार पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घडला आहे. पिडीत विद्यार्थी हा दहावीच्या वर्गात शिकतो. त्याचे वय 17 वर्षे आहे. याच शाळेत एक शिक्षिका आहे. तिचे वय जवळपास 27 वर्षे आहे. 27 डिसेंबरला हा विद्यार्थी दहावीची सराव परिक्षा देण्यासाठी शाळेत आला होता. त्याच वेळी या विद्यार्थ्याला त्या शिक्षिकेने गळ घातली. त्याला प्रेमाची भुरळ टाकली. त्यानंतर त्याला शरीर संबध ठेवण्यासाठी प्रोत्साहीत केलं. त्याला उत्तेजित केलं. 

ट्रेंडिंग बातमी - Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID च्या हाती काय लागलं? तपासाला आला वेग

हा सर्व प्रकार त्यावेळी शाळेतच होत होता. विद्यार्थी उत्तेजित झाल्यानंतर तिनं त्याला शाळेतीलच स्टाफ रूममध्ये नेलं. तिथेच त्याच्यावर अत्याचार केले. स्टाफरुममध्ये काही तरी वाईट सुरू आहे. याची भनक शाळेच्या मुख्याध्यापिकेला लागली. त्याच वेळी त्यांनी तातडीने स्टाफरुममध्ये धडक दिली. त्यानंतर हे दोघे ही नकोत्या स्थितीत आढळून आले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. तातडीने विद्यार्थ्याच्या पालकांना याची माहिती देण्यात आली. ते ही शाळेत दाखल झाले. 

ट्रेंडिंग बातमी -  बीड हत्याकांड प्रकरणी CM फडणवीसांचे मोठे आदेश, फरार आरोपींना दणका; 'ते' फोटोशूटही भोवणार

याबाबत  मुलाच्या आईने खडक पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. झालेली संपुर्ण घटना त्यांनी पोलिसांना सांगितली. शिवाय संबधित शिक्षिके विरोधात तक्रार ही दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर  संबंधित शिक्षकेला अटकही करण्यात आली आहे. त्या दहावीतल्या विद्यार्थ्या बरोबर आपण शरीर संबध प्रस्थापित केल्याची कबुली संबधित शिक्षिकेने दिले आहे. तिचे मेडीकलही करण्यात आले आहे. त्यानंतर तिची रवानगी तुरूंगात करण्यात आली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Tourism News: महाबळेश्वर, लोणावळ्या बरोबर 'हे' थंड हवेचे ठिकाणी झालं हाऊसफुल पण...

याकृत्यानंतर त्या शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय झालेल्या प्रकारानंतर मुख्याध्यापकांनी पालकांची बैठक घेतली. शिवाय झालेल्या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. यावेळी पालकांनी झालेल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणा बरोबर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही शाळेनं घेतली पाहीजे अशी मागणी करण्यात आली. या घटनेने शाळा आणि शिक्षकांवरी विश्वासाला तडा गेला आहे असं मतही काही जणांनी व्यक्त केलं. यानंतर अशा घटना होणार नाहीत असं आश्वासन यानंतर शाळा प्रशासनानं दिलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com