Mumbai News: मुंबईकरांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला शिका, BMC देणार प्रशिक्षण; कशी कराल नोंदणी? वाचा...

ऑलिम्पिक जलतरण तलाव या दोन्ही जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 21 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

मुंबई: उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे.  या उत्तम व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने सभासद नोंदणीची सुविधा देखील सुरू केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दादर (प) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव आणि चेंबूर (पू) येथील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव या दोन्ही जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी 21 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिनांक 2 मे 2025 पासून 21 दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. तर याच प्रशिक्षणाच्या दुसऱ्या कालावधीचा प्रारंभ दिनांक 23 मे 2025 पासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, दिनांक 21 एप्रिल 2025 सकाळी 11 वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच इतर जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा नव्याने उपलब्ध होणार आहे. 

Advertisement

मुंबईकर नागरिकांना जलतरण या क्रीडा व व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे 11 तरण तलाव कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement

(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती उप आयुक्त (उद्याने) श्री. अजित आंबी यांनी दिली आहे.

Advertisement

या दोन्ही जलतरण तलावात प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे. पंधरा वर्षांपर्यंतची मुले, 60 वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती  यांच्यासाठी 2 हजार 210 रूपये, तर 16 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी 3 हजार 310 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. दादर आणि चेंबूर येथील दोन्ही जलतरण तलावांमध्ये दररोज तीन सत्रांमध्ये जसे की दुपारी 12.30 ते 1.30, दुपारी 2 ते 3.30 आणि दुपारी 3.30 ते 4.30 अशाप्रकारे प्रशिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षणाच्या नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी 18001233060  या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

(नक्की वाचा-  Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा)

दादर आणि चेंबूर वगळता इतर 9 जलतरण तलावांमध्ये दिनांक नागरिकांच्या सुविधेसाठी मासिक, त्रैमासिक सभादत्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची नोंदणी दिनांक 21 एप्रिल 2025 पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीनेच होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी 18001233060  या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मासिक, त्रैमासिक सभादत्वाची सुविधा असलेल्या तलावांचा तपशील पुढीलप्रमाणे :-
कांदिवली (पश्चिम) येथील  सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव 
दहिसर (पश्चिम) येथील श्री भावदेवी कांदरवाडा जलतरण तलाव 
दहिसर (पूर्व) येथील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव
मालाड (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
गिल्बनर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव 
अंधेरी (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वरळी येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
विक्रोळी (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वडाळा येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव

(नक्की वाचा: Saleel Kulkarni Video : 'नवीन डेटा पॅक दे रे'; सोशल मीडियाचं भयाण वास्तव, प्रत्येकाने ऐकावी अशी कविता)