मुंबईतील सगळे रस्ते गुळगुळीत करणार अशी घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी मुंबईतील सगळ्या रस्त्यांचे कॉन्क्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र सध्या मुंबईतील स्थिती अशी आहे की एकही रस्ता धड अवस्थेत नाहीये. मुख्य रस्ता असो अथवा शहरातील अंतर्गत रस्ते मुंबईतील एकही रस्ता असा नाही ज्यावर खड्डे नाहीत. पावसाची उघडीप मिळाल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र ज्या पद्धतीने हे खड्डे बुजवले जात आहेत ते पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नक्की वाचा: पृथ्वी आहे की चंद्र? ड्रोन दृश्ये पाहिल्यावर पडलाय प्रश्न
श्रीमंत महापालिका, दळभद्री उपाययोजना
मुंबई महानगरपालिका ही देशातल्या सगळ्यात श्रीमंत महापालिकांपैकी एक आहे. खड्डे बुजवण्यासाठी रोडरोलर किंवा इतर यंत्रे वापरणे सहज शक्य असताना कामगारांना खड्ड्यांमध्ये डांबर टाकून ते हाताने ठोकून सपाट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एक साधं चोपाटणं देखील खरेदी करण्यात आलं नसून पेव्हर ब्लॉकचा डांबर ठोकून, खड्डा बुजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नक्की वाचा: खड्ड्यामुळे आणखी एकाचा बळी, शिंदेंच्याच कार्यकर्त्याचा एकुलता एक लेक गेला
खड्डे बुजवण्यासाठी अश्मयुगीन तंत्रज्ञान
सोशल मीडियावर मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. एका व्यक्तीने दहीसर टोल नाक्याजवळचा व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये डेब्रिसचा वापर करून खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याचं दिसून येत आहे. खरं पाहाता हे खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा किंवा क्विक फिक्स तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. अन्यथा हे खड्डे तात्पुरते बुजवण्यात येतील मात्र मोठा पाऊस आल्यानंतर तो खड्डा पुन्हा तयार होईल अशी भीती असते.
यावर सोशल मीडियावर अनेकजण व्यक्त होत असून एकाने म्हटलंय की ही तर शुद्ध थूकपट्टी आहे.
दुसऱ्या एकाने म्हटलंय की मुंबई महापालिका उगाचच हॉट मिक्स आणि कोल्ड मिक्सवर पैसा खर्च करतंय.