Mumbai-Pune Expressway : तुम्ही नियमित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एग्झिट मार्ग 11 फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सहा महिन्यांपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार असून यासाठी कळंबोली सर्कल येथील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे कळंबोली सर्कल येथील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी या द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट मार्ग 11 फेब्रुवारीपासून पुढील सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
नक्की वाचा - Indian Railway: रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना कन्फर्म मिळणार लोअर सीट! 'या' पद्धतीनं करा बुकिंग
काय आहे पर्यायी मार्ग?
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुगती महामार्गावरील पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारातील वाहनांना कोनफाटा येथे डावीकडे वळण घेऊन एनएच 48 मार्गावरील पळस्पे सर्कल येथून इच्छितस्थळी जाता येणार आहे. त्याशिवाय मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरुन तळोजा, कल्याण-शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरुन पुरुषार्थ पेट्रोलपंप उड्डाणपुलाखालून उजवीकडे वळण घेऊन रोडपाली येथून एन.एच 48 महामार्गावरुन अपेक्षित ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी मार्ग असेल.