Railway News: दरडीचा फटका! मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद, 'या' 16 एक्सप्रेस रद्द; वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

मुंबई विभागातील 'अप मेन लाइन'वर ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर ६ जुलै रोजी पुणे–मुंबई मार्गावरील १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Pune Train Cancelled:  मुंबईसह पुण्यात पावसाने थैमान घातले आहे. या पावसाचा मोठा फटका ट्रेन वाहतुकीला बसला आहे. मुंबई- पुणे मार्गावरुन जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.  रविवारी उशिरा कर्जत आणि लोणावळा दरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाट भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली, ज्यामुळे मुंबई-पुणे या वर्दळीच्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीत व्यत्यय आला. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 'अप मेन लाइन'वर ठाकूरवाडी आणि मंकी हिल लूप केबिन दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर ६ जुलै रोजी पुणे–मुंबई मार्गावरील १६ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 

Mumbai Pune Rain LIVE: महाराष्ट्रात मुसळधार! लोकलचा खोळंबा, इंद्रायणीवरील सर्व पूल बंद, वाचा LIVE अपडेट्स

कोणकोणत्या एक्स्प्रेस रद्द? 

२२१०५/२२१०६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंद्रायणी एक्सप्रेस
१२१६९/१२१७० पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
१२१२७/१२१२८ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस
११००७/११००८ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्सप्रेस
१२१२३/१२१२४ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी डेक्कन क्वीन
१२१२५/१२१२६ सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी प्रगती एक्सप्रेस
११००९/११०१० सीएसएमटी-पुणे-सीएसएमटी सिंहगड एक्सप्रेस
११०११/११०१२ सीएसएमटी-धुळे-सीएसएमटी एक्सप्रेस

Advertisement

या गाड्यांचे मार्ग बदलले

याव्यतिरिक्त, नऊ लांब पल्ल्याच्या गाड्या पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. यामध्ये अहमदाबाद-कोल्हापूर एक्सप्रेस, इंदूर-दौंड एक्सप्रेस, अहमदाबाद-पुणे दुरंतो एक्सप्रेस, बिदर-सीएसएमटी एक्सप्रेस, हझूर साहिब नांदेड-पनवेल एक्सप्रेस, चार्लापल्ली-इंदूर हमसफर एक्सप्रेस, एलटीटी-एसएमव्हीटी बेंगळुरू एक्सप्रेस, दौंड-ग्वाल्हेर सुपरफास्ट एक्सप्रेस आणि चेन्नई एग्मोर-सीएसएमटी मेल यांचा समावेश आहे.

Pune Rain: पुणेकरांवर अतिवृष्टीचं मोठं संकट! 'हे' मोबाईल नंबर लिहून ठेवा; प्रशासनाचे मोठे आवाहन