मुंबईसह महाराष्ट्रभरात तुफान पाऊस सुरू आहे. पुणे, सातारा, रायगड जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेल अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान पुढील काही तास मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मध्य रेल्वेकडून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वडाळा ते सीएसएमटी आणि वडाळा ते पनवेलच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वडाला ते सीएसएमटी स्थानकावर 8 इंचापेक्षा जास्त पाणी साचल्यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहे.
गेल्या 45 मिनिटांपासून हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प असल्याची माहिती आहे. त्यामुळे बराच वेळापासून प्रवासी स्थानकावर बसून आहेत. यावेळी कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नेमकं कारण लक्षात येत नाहीत. सध्या फक्त वाशी ते ठाणे ट्रान्स हार्बरवरील वाहतूक सुरू आहे.
नक्की वाचा - Maharashtra Rain: सतर्क रहा, काळजी घ्या! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रविवार 25 मे 2025 च्या मध्यरात्रीपासून आणि सोमवारी 26 मे 2025 सकाळी 11 वाजेपर्यंत सर्वाधिक पाऊस पडलेल्या ठिकाणांची आकडेवारी पुढीलप्रमाणे
नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्र २५२ मिमी
ए विभाग कार्यालय २१६ मिमी
महानगरपालिका मुख्यालय २१४ मिमी
कुलाबा उदंचन केंद्र २०७ मिमी
नेत्र रूग्णालय, दोन टाकी २०२
सी विभाग कार्यालय (चंदनवाडी, मरीन लाईन्स) १८०
मेमनवाडा अग्निशमन केंद्र १८३
ब्रिटानिया उदंचन केंद्र, वरळी १७१
नारियलवाडी शाळा, सांताक्रूझ १०३
सुपारी टँक, वांद्रे १०१
जिल्हाधिकारी वसाहत, चेंबूर ८२
एल विभाग कार्यालय, कुर्ला ७६