2 days ago

Maharashtra Rain Update : पुढील आठवडाभर हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला असून पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. आज रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई आणि उपनगरातही पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज सकाळपासूनच ठाणे आणि मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. 

Jul 21, 2025 12:08 (IST)

Live Update : रत्नागिरीत सकाळपासून पावसाची संततधार, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

रत्नागिरीत सकाळपासून पावसाची संततधार, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

24 तासांत सरासरी 32.94 मिलीमीटर पावसाची नोंद

जिल्ह्याला 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाची सरींवर बरसात

आजही जिल्ह्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच

पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

दमदार पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांना दिलासा

24 तासांतील पावसाची स्थिती

१) मंडणगड - 47.00  मिमी 

२) खेड -  23.42  मिमी  

३) दापोली - 37.28  मिमी

४) चिपळूण - 22.44 मिमी 

५) गुहागर - 27.20  मिमी 

६) संगमेश्वर -    39.50 मिमी 

७)रत्नागिरी - 25.66  मिमी 

८) लांजा -  36.60  मिमी 

९) राजापूर - 37.50  मिमी

Jul 21, 2025 12:06 (IST)

Live Update : मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

कुलाबा वेधशाळेने पुढील 24 तासांसाठी दिलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून मध्यम स्वरुपाचा पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 

Jul 21, 2025 11:56 (IST)

Live Update : मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, हवामान विभागाचा इशारा

कोकणात ऑरेंज अलर्ट तर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय साताऱ्यासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात समुद्रात उंच लाटा राहतील. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असं सांगण्यात आलं आहे. 

Jul 21, 2025 11:16 (IST)

Live Update : मुंबईला ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाचं धुमशान

मुंबईत अनेक ठिकाणी पावसाचं धुमशान

मुंबईला ऑरेंज अलर्ट

समुद्राला भरती, 12 फुटांपेक्षा उंच लाटा...

Advertisement
Jul 21, 2025 10:53 (IST)

Live Update : पुढील 3 तास धोक्याचे! मुंबई, उपनगरासह अनेक भागात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील 3 तासांत मुंबई आणि मुंबई उपनगरातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, रायगड, मुंबई, रत्नागिरी या जिल्ह्यात पुढील तीन तास मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे- मंत्रालय.

Jul 21, 2025 10:40 (IST)

Live Update : रिमझिम रिमझिम..मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरील दृश्य

Advertisement
Jul 21, 2025 10:28 (IST)

Live Update : मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात वाहतुकीला फटका..

मध्यरात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाणे शहरात वाहतुकीला फटका..

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाण्याहून नवी मुंबईकडे जाणारी वाहतूक खोळंबली. चाकरमान्यांची फजिती..

ठाण्याकडून नवी मुंबई, पनवेल, ऐरोली अशा अनेक प्रमुख मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर कळवा येथे प्रचंड वाहतूक कोंडी.. एक ते दीड किलोमीटर लांबच लांब लागल्यात वाहनांच्या रांगा....

कळवा येथील रेल्वे उड्डाणपुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक कोंडी.. प्रशासनाच्या वतीने पाणी बाजूला काढण्याचे काम सुरू..

Jul 21, 2025 09:39 (IST)

Live Update : मुंबईत काळ्या ढगांसह रिपरिप सुरूच

मुंबईत पुन्हा पावसाला सुरुवात

मुंबईत सध्या मध्यम स्वरूपाचा पावसासह अंधारमय वातावरण 

समुद्राला सुद्धा भरती साधारण १२ फुट पेक्षा लाटा उसळत आहेत

Advertisement
Jul 21, 2025 08:42 (IST)

Live Update : मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप

मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्याची माहिती आहे

Jul 21, 2025 08:40 (IST)

Live Update : हा आठवडा पावसाचा...

22 जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्या काही राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 23 जुलै रोजी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगड सह पुण्यालाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे हा आठवडा पावसाचा असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.