1 month ago
मुंबई:

Mumbai Rains Live Updates: मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबईसह ठाणे पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील आठवडाभर पावसाची दमदार हजेरी राज्यात असेल. आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पावसा बाबतच्या राज्यातील सर्व अपडेट तुम्हाला एका क्लिकवर मिळणार आहेत.  

Jun 16, 2025 22:47 (IST)

संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं एका घरात अडकलेल्या व्यक्तींचं रेस्क्यू

संगमेश्वर तालुक्यातील धामणी इथं एका घरात अडकलेल्या व्यक्तींचं पोलिसांकडून रेस्क्यु

शास्त्री नदीला पूर आल्याने बाळकृष्ण पवार यांच्या घराला पुराच्या पाण्याचा वेढा

घराच्या चारही बाजूला पाणी असल्याने घरी असलेली माणसे पडली होती अडकून

लहान मुलांसह चार माणसांचे संगमेश्वर पोलिसांकडून रेस्क्यु

संगमेश्वर पोलिसांनी पाण्यात उतरून दोरीचा वापराने रेस्क्यूने सुखरुप बाहेर काढले

Jun 16, 2025 22:46 (IST)

मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्रीपुल येथे दरड कोसळली

मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर शास्त्रीपुल येथे दरड कोसळली

संध्याकाळची घटना; वाहतुकीला फटका

दरडीच्यावरील जमिनीला तडे गेल्याने तीन घरांना धोका

काही दिवसापूर्वी याच ठिकाणी रिक्षावर दरड कोसळल्याने ग्रामस्थानी रोखून धरला होता महामार्ग

Jun 16, 2025 21:37 (IST)

मुसळधार पावसामुळे माखजन बाजारपेठही पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे आज संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजारपेठही पाण्याखाली गेली आहे. गडनदीला पूर आल्यानं बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे. तब्बल चौदा तासाहून अधिक काळ माखजन बाजारपेठेत पुराचं पाणी आहे. पुराचं पाणी दुकानांमध्ये, घरामध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात साहित्यांचे नुकसान झालं आहे. दुकानातील महत्त्वाचे सामान सुरक्षित स्थळी घेऊन जाण्यासाठी पाण्यातून जाण्याची जोखीम येथील व्यापारी उचलताना दिसून येत आहेत. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत.

Jun 16, 2025 20:29 (IST)

मुंबई शहरात 50.20 मीमी इतका पाऊस

मुंबईत सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 पर्यंत कुलाबा मध्ये 42.2 इतका पाऊस पडला आहे.

सांताक्रूझ विभागात 69.6 इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात 50.20 मीमी इतका पाऊस झाला, मुंबई पूर्व उपनगरात 70.15 मीमी पाऊसाची नोंद झाली आहे. तर पश्चिम उपनगरात 75 मीमी पावसाची नोंद झाली आहे.

Advertisement
Jun 16, 2025 20:26 (IST)

कल्याण डोंबिवलीत 13 ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना

कल्याण डोंबिवलीत आज सकाळपासून जोरदार पाऊस 

एकीकडे सखल भागात पाणी साचले तर  अनेक ठिकाणी झाडे कोसळली 

डोंबिवली पूर्व काही वाहनांवर झाड कोसळल्याने गाड्यांचे नुकसान

13 ठिकाणी झाडे कोसळल्याची प्राथमिक माहिती

Jun 16, 2025 19:28 (IST)

पावसामुळे अंधेरी सब वे नेहमी प्रमाणे पाण्याखाली

अंधेरी पश्चिम सबवे दर वर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुसळधार पावसाने पूर्ण पाण्याखाली गेला आहे.  पूर्वेकडे जाण्यासाठी नागरिकाचे त्यामुळे हाल झाले आहेत. 

Advertisement
Jun 16, 2025 18:58 (IST)

वसई विरार परिसरातील सखल भागांतील मुख्य रस्ते पाण्याखाली

वसई विरार शहरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम असून दिवसभरात झालेल्या जोरदार पावसामुळे महापालिका क्षेत्रातील  सखल भागांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे याचा थेट फटका शहराच्या वाहतुकीवर बसला आहे. या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढत प्रवास करावा लागतोय. यामध्ये वसई विरार महापालिकेची आपत्ती व्यवस्थापन विभाग पाण्याच्या निचरा करण्यासाठी कोणतीही उपायोजना करत नसल्याचे दिसून आले आहे.

Jun 16, 2025 18:31 (IST)

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील माती आली पेढे गावात

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील माती आली पेढे गावात

 परशुराम घाटात गॅबियनवॉलच्या आजूबाजूची माती गेली वाहून

मुसळधार पावसामुळे माती वाहून गेली पेढे गावात

परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे पेढे गाव

गावातील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात माती , मातीमुळे गावात चिखलाचं साम्राज्य

ठोस उपाय योजना करण्याची ग्रामस्थांकडून मागणी

Advertisement
Jun 16, 2025 18:28 (IST)

कल्याण पश्चीमेतील गोविंदवाडी परिसरात नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरले

कल्याण पश्चीमेतील गोविंदवाडी परिसरात  नाल्याचे पाणी लोकांच्या घरात शिरले आहे. त्यामुळे लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.  परिसरात नालेसफाई न झाल्याने अशी स्थिती उद्धवली आहे.

Jun 16, 2025 18:27 (IST)

कराड चिपळूणला जोडणारा रस्ता पुराच्या पाण्यात गेला वाहून

कराड - चिपळूणला जोडणारा रोड पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे अनेक वाहानांची ही या भागात कोंडी झाली आहे. 

Jun 16, 2025 18:09 (IST)

अकोल्यातही पावसाची जोरदार हजेरी

तिकडे, अकोल्यात मृग नक्षत्रापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज पावसाने हजेरी लावली आहे. संपूर्ण नदी व नाले ओसंडून वाहत आहे. शहरात धुवाधार पावसाने सुरुवात केली आहे. गेल्या अर्धा तासापासून हा पाऊस अकोला शहरात पडतोय. प्रादेशिक हवामान विभागाच्या कडून अकोला शहरात पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला होता.  वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात उकाड्यापासून अकोल्यातील नागरिकाला दिलासा मिळाला. मात्र या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Jun 16, 2025 18:06 (IST)

सिंधुदुर्गातील करूळ घाटात कोसळलेली दरड हटवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुसळधार पावसाने सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास करूळ घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे सात तासापेक्षा जास्त वेळ घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घाटातून होणारी वाहतूक भुईबावडा व फोंडा घाटातून वळवण्यात आली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून तीन जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर कोसळलेली दरड हटवून सायंकाळी चार वाजल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू केले आहे. मात्र याठिकाणी आणखी दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे रस्ता सुपरफास्ट झाला असला तरी दरडी कोसळण्याचा धोका मात्र कायम आहे.

Jun 16, 2025 17:35 (IST)

मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचलं

सकाळपासून मुंबईत सुरु असलेल्या पावसाने काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईतील किंग सर्कल परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.

Jun 16, 2025 17:33 (IST)

गेटवे ऑफ इंडियाला उसळल्या मोठ्या लाटा

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर गेटवे ऑफ इंडियाला उंच लाटा फेसाळताना पाहायला मिळत आहेत या लाटांचे चित्रीकरण करण्यासाठी मुंबईतील नागरिकांनी गर्दी केली आहे. मात्र सतर्कता बाळगण्याच्या आव्हानामुळे मोठा पोलीस फौज फाटा गेटवे ऑफ इंडिया ला तैनात करण्यात आला आहे. 

Jun 16, 2025 17:32 (IST)

सावंतवाडी मार्गावरील होडावडा पुलावर पाणी

सावंतवाडी मार्गावरील होडावडा पुलावर आज पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. हा पुल कमी उंचीचा रस्त्यालगत असल्याने दरवर्षी या पुलावर पाणी येते. वाहन चालकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मात्र पुलाची उंची वाढविण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

Jun 16, 2025 17:26 (IST)

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले

सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सलग दोन दिवस धो-धो कोसळणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे. या मुसळधार पावसामुळे भुईबावडा येथील घाणेगडवाडी कॉजवे पाण्याखाली गेला आहे.

तालुक्यात सलग दोन दिवस पाऊस कोसळत आहे. आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. ठिकठिकाणी शेतीत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. भुईबावडा-घाणेगडवाडी येथील कॉजवे पाण्याखाली गेला आहे.

Jun 16, 2025 17:25 (IST)

कोयना धरणात दिवसभराच्या पावसामुळे तब्बल दोन टीएमसी पाण्याची आवक

कोयना धरणात दिवसभराच्या पावसामुळे तब्बल दोन टीएमसी पाण्याची आवक

कोयना पानलोटक्षेत्रात पावसाचा जोर वाढला

सकाळी 8 पासून कोयना धरण परिसरात 95 मिलीमिटर पावसाची नोंद तर

महाबळेश्वर परिसरात 90 मिलीमिटर पावसाची नोंद

Jun 16, 2025 17:04 (IST)

पुण्यातील भूशी डॅम ओव्हर फ्लो

लोणावळाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. भूशी धरण ओसंडून वाहत आहे. पावसाळ्यातील दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी धबधबे आणि धरणांमध्ये प्रवेश बंदी केली आहे. सुरक्षित रहा, नियमांचे पालन करा असे आवाहन करण्यात आले आहे. 

Jun 16, 2025 16:59 (IST)

मुसळधार पावसामुळे राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर

रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरला तालुक्याला देखील मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं आहे. आजही सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजापूरमधील अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला असून, पुराचं पाणी राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत आलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.

Jun 16, 2025 16:58 (IST)

मुसळधार पावसामुळे लांजा तालुक्यात नदीजवळील भात शेती पाण्याखाली

रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यात पावसाची संततधार कायम आहे. मुसळधार पावसामुळे नदीजवळील भात शेती पाण्याखाली गेली आहे. पेरणी केलेलं भात पीक पाण्याखाली गेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच लांजा तालुक्यातून वाहणारी काजळी नदी सध्या दुथडी भरून वहात आहे. लांजा तालुक्यात 24 तासांत 139 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर साटवली विभागात 225 मिलिमिटर इतका विक्रमी पाऊस झाला आहे.

Jun 16, 2025 16:56 (IST)

सिंधुदुर्गला ही पावसाने झोडपले

सिंधुदुर्गात रात्रभर मुसळधार पावसाने झोडपून काढलं असून आता देखील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात एकीकडे मुसळधार पाऊस कोसळत आहे, तर दुसरीकडे समुद्र देखील खवळलेला आहे. किनाऱ्यावर ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे, तरीदेखील काही मच्छीमार आपला जीव धोक्यात घालून मासेमारी करत आहेत. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे, 

Jun 16, 2025 16:53 (IST)

भिवंडी अंजूर फाटा राहणाळ रस्त्यावर पाणीच पाणी

सकाळपासून भिवंडीत मुसळधार पाऊस सुरु असल्याने शहरातील भिवंडी ठाणे जूना आग्रा रोड, नारपोली राहणाळ रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले आहे, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. दरवर्षी नालेसफाई केली जाते परंतु थोड्याच पावसात रस्त्यावर पाणी जमा होत असल्याने नक्की नालेसफाई झाली का असं सवाल उपस्थित होत आहे.

Jun 16, 2025 16:50 (IST)

मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

मुंबई गोवा महामार्गाला मुसळधार पावसाचा फटका

पावसाने उघड केला मुंबई-गोवा महामार्गाच्या निकृष्ट कामाचा दर्जा

लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली

सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारासची घटना

महामार्गावरची वाहतुक एका लेथवरून सुरु

महामार्गावर कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरु

महामार्गावरची यंत्रणा वाकेड घाटात दाखल, वाहतुकीवर मोठा परिणाम नाही

Jun 16, 2025 16:46 (IST)

Konkan Rain : संगमेश्वर बाजारपेठेत घुसलं पुराचं पाणी

रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस बरसत होता.  संततधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाल्याने संगमेश्वर येथील रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानात, तसेच नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. रामपेठ बाजारपेठेतील मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पाण्यातूनच नागरिक आणि ग्राहकांना वाट काढत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पाण्याचा प्रवाह वाढत असल्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Jun 16, 2025 16:45 (IST)

Rain News - मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे महामार्ग खचला

मुंबई गोवा महामार्गावर कळंबणी येथे महामार्ग खचला आहे.  मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.  वाळंजवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्याच्या काँक्रिटला मोठे तडे जाऊन रस्ता खचला आहे.  खबरदारी म्हणून स्थानिकांनी महामार्गावर टाकल्या झाडाच्या फांद्या. रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाल्यामुळे वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी

Jun 16, 2025 16:42 (IST)

संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे दरड कोसळली

संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे लँडस्लाईड

धामणी गोळवलीतील डोंगराचा काही भाग आला खाली

धामणीत रात्री तीन तासांत पडला मुसळधार पाऊस

पावसामुळे डोंगराचा काही भाग आला खाली

डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे गेली भरुन

डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं देखील मोठं नुकसान

सुदैवाने कोणीतही जीवितहानी नाही

Jun 16, 2025 16:41 (IST)

वर्ध्यात पेरणीला सुरुवात

वर्ध्यात पेरणी ला सुरुवात

पेरणीसाठी मुबलक।पाऊस पडल्याने शेतकरी लागले कामाला

पेरणीच्या लगबगीने शेतशिवार गजबजले....रानात प्रत्यर्क जागी दिसतायेत मजूर वर्ग कामात मग्न

पण पेरणीसाठी मजूर मिळत नसल्याने दोन दिवसगोदरच मजुरांना करावे लागते कामावर येण्यासाठी विनंती

वर्ध्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पेरणी आता सुरू झाली आहे.

Jun 16, 2025 16:38 (IST)

Rain News: कराड चिपळून रोड बंद, वाजेगाव येथे पर्यायी बनवलेला रस्ता गेला वाहून

कराड चिपळून रोड बंद झाला आहे.  वाजेगाव येथे पर्यायी बनवलेला मोरीचा रस्ता वाहून गेला आहे. कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्यानाल्यांना महापुर आलाय.  कराड- चिपळूण महामार्गाचे गेल्या दोन वर्षापासून काम सुरू आहे. मोठ्या पुलाचे काम सुरू असल्यामुळे पर्यायी रस्ता मोरी टाकून केला होता.  मोरी तयार करताना ठेकेदाराने मातीचा वापर केला.  पावसाच्या पाण्याचा आलेल्या लोढ्यामुळे मोरी वाहून गेली आहे. त्यामुळे  असंख्य वाहने जाग्यावर थांबली आहेत. 

Jun 16, 2025 16:35 (IST)

Rain update: नवी मुंबईला पावसाने झोडपले

नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे वाशी बेलापूर खारघर सानपाडा नेरूळ या ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावायला सुरुवात झाली आहे कालपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये तुर्भे ते महापे एमआयडीसी रोड मध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत

Jun 16, 2025 16:28 (IST)

Rain News: वाशीमध्ये भिंत खचली, पार्किंगमधील गाड्यांचे मोठे नुकसान

नवी मुंबईतील वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे.  भिंत खचल्याने पार्किंगमधील अनेक वाहने दाबून मोठे नुकसान झाले आहे.  स्थानिक नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. 

आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.  कोणतीही जीवितहानी झालेली  नाही.

Jun 16, 2025 16:26 (IST)

Rain News: नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात जोरदार वाऱ्यामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली

नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात जोरदार वाऱ्यामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली. सेक्टर 48A नवघरकुल सोसायटी लगत एक झाड कोसळले आहे. सेक्टर 50 जुने शेल्टर प्लाझा रिक्षा स्टँड जवळील दुसरे झाडही कोसळले आहे.  या घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाकडून झाड हटवण्याचे काम सुरू असून वाहनधारकांत नाराजीचे वातावरण आहे.

Jun 16, 2025 16:25 (IST)

Rain Update : परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात गेली वाहून

मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉलही ढासळण्याची भीती निर्माण झाली आहे. पाण्याच्या प्रवाहात गॅबियन वॉलच्या आजूबाजूची मोठ्या प्रमाणात माती वाहून जाऊ लागल्यामुळे उर्वरित भराव वाहून जाण्याची भीती आहे. 

मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात हाय वे प्रशासन फोल ठरतोय का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. यामुळे परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Jun 16, 2025 16:24 (IST)

Rain Update: नवी मुंबईत जोरदार पाऊस

नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे वाशी बेलापूर खारघर सानपाडा नेरूळ या ठिकाणी पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावायला सुरुवात झाली आहे कालपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये तुर्भे ते महापे एमआयडीसी रोड मध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत.