Mumbai Rain Live Updates: मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या हजेरीमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
Rains Live Updates: साताऱ्यातील कोयना धरणातून मोठा विसर्ग सुरू होणार
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज रात्री ११ वाजता, कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ५ फुटांवरून ७ फुटांपर्यंत उघडण्यात येणार आहेत.
यामुळे तब्बल ४४,८०० क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडले जाणार आहे. याशिवाय कोयना धरण पायथा विद्युतगृहाची दोन्ही युनिट सुरू असून, त्याद्वारे आणखी २,१०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
एकूण मिळून ४६,९०० क्युसेक्स पाणी कोयना नदीत सोडण्यात येणार असून, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Rain News: मुंबई गोवा महामार्गावर पावशी नदी पुलावर भले मोठे भगदाड
मुंबई गोवा महामार्गावर पावशी नदी पुलावर भले मोठे भगदाड
मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी रस्त्याच्या मधोमध मोठं भगदाड.
बेल नदी पुला दरम्यान तीन ते चार फुट खोल भलं मोठ भगदाड रस्त्यात पडलं.
रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता.
मुंबई गोवा हायवे महामार्ग च्या ठेकेदाराचा पूर्णपणे दुर्लक्ष
हायवे वरील प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नाराजी
मात्र याच महामार्गावर मोठं भगदाड पडल्याने रस्त्यांच्या कामाचा दर्जा बाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
Rain News: नांदेडच्या मुखेड तालुक्यात बचावकार्य पूर्ण
मुखेड तालुक्यात बचावकार्य पुर्ण
चार गावात 293 लोक अडकले होते पुराच्या पाण्यात
- रावणगाव - येथून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढले
-
- हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले , पाच जण वाहून गेले त्यापैकी तीन मृतदेह सापडले
- भासवाडी - 20 जणांना बाहेर पडले
- भिंगोली - 40 जणांना बाहेर काढले
- एसडीआरएफ च्या पथकाने पुर्ण केलें बचावकार्य
Rain News: नांदेडच्या मुखेड तालुक्यात बचावकार्य पूर्ण
मुखेड तालुक्यात बचावकार्य पुर्ण
चार गावात 293 लोक अडकले होते पुराच्या पाण्यात
- रावणगाव - येथून 225 जणांना सुरक्षित बाहेर काढले
-
- हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले , पाच जण वाहून गेले त्यापैकी तीन मृतदेह सापडले
- भासवाडी - 20 जणांना बाहेर पडले
- भिंगोली - 40 जणांना बाहेर काढले
- एसडीआरएफ च्या पथकाने पुर्ण केलें बचावकार्य
Rain News: नांदेडच्या मुखेडमध्ये बचाव कार्यसाठी सैन्य दल दाखल
नांदेडच्या मुखेड तालुक्यात भारतीय सैन्य दल दाखल, या दलात एकूण 63 जवान आणि 2 अधिकारी 10 वाहने यांचा समावेश. ही पथक मुखेड तालुका मुख्यालयात थांबणार, आवश्यकते प्रमाणे प्रशासन या तुकडीला निर्देश देणार. तालुक्यातून एकूण 9 इसम बेपत्ता...आतापर्यंत 3 जणांचे मृतदेह हस्तगत
Rain News: जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडे
जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आलेले असून यात 4 दरवाजे पूर्ण व 16 दरवाजे 1 मीटरने उघडून धरणातून 54 हजार 103 क्यूसेक पाण्याचा तापी नदी पात्रात विसर्ग सुरू असल्याची माहिती हतनुर धरण प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत धरण 60.70% भरले असून धरणात पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याचा अंदाज पाटबंधारे विभागाने वर्तवला असून त्यामुळे तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे..
Rain Update: चांदोली धरण 95 टक्के भरले, धरणातून 17 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 43 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून चांदोली धरण 95 टक्के भरले आहे.त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात 17 हजार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.गेल्या आठवड्यापासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे.34.40 टीएमसी क्षमता असणाऱ्या धरणात आता 32 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाला प्रशासनाकडून धरणातून पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येत असल्याने वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे,असा आवाहन करण्यात आले आहे.
कल्याण ग्रामीणमधील शीळ परिसरात घर, रस्ते आणि बाेगदे जलमय
कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या शीळ, डायघर, निळजे. लेाढा हेवन परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोढा आणि निळजे नागरीकांसाठी एक बोगदा तयार केला करण्यात आला हाेता. रेल्वेचे फाटक बंद करण्यात आल्याने हा पादचारी बोगदा तयार केला होता. त्यात पावसाचे पाणी साचल्याने नागरीकांना त्रास सहन करावा लागला. पावसाने पाण्याची नागरीकांची वाट बंद झाली. पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले.
Rain News: मुंबईतही शाळा कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर
Rain News: या भागात उद्या शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई, ठाणे, कल्याणमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उद्याही पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
bhivandi rain : भिवंडी (दापोडे-मानकोली नाका) येथे पाणी पाणी
भिवंडी तालुक्यातील दापोडे गाव, विशेषतः मानकोली नाका परिसर हा मोठ्या कंपन्यांच्या गोदामांसाठी इंडियन कॉर्पोरेशन गोदाम परिसरात सततच्या मुसळधार पावसामुळे दापोडे येथील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. रस्ते गुडघाभर पाणी जमले असून वाहन चालक यांना रस्ता शोधण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे
Rain News: कळव्यात मोठ्या प्रमाणात साचले पाणी
ठाणे शहरात मुसळधार पाऊस पडत असून शहरातील कळवा पूर्व या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे..
साचलेल्या पाण्यातून वाट काढताना स्थानिक नागरिकांना अनेक अडचणी येत आहेत.
दुपारच्या शाळांना सुट्टी जाहीर केल्याने लहान मुलांना चक्क बोटीने पुढे नेण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांकडून हे मदत कार्य सध्या सुरू असून प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणताही मदत कार्य होत नसल्याचा स्थानिकांनी सांगितला आहे.
Kalyan Rain News: कल्याणमध्ये अनेक घरात पाणी साचले
कल्याणमध्ये मुसळधार पावसामुळे शिळ गावातील अनेक घरात पावसाचे पाणी घुसले आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
Rain Update: कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना
कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना
नेतिवली टेकडीतील पोलीस स्टेशनच्या पाठी असलेल्या जय भवानी नगरमध्ये घडली घटना
दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान मात्र, सुदैवाने घरातील लोक कामासाठी बाहेर असल्याने कोणतीही जीवितहानी टळली
दरडीसोबत विद्युत वाहिनी तुटल्यामुळे परिसरात विजेचा धोका निर्माण झाल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट आणि भीतीच्या वातावरण
अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.
Rain Update: कशेडी घाटात कंटेनर पलटी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
कशेडी घाटात कंटेनर पलटी; महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर शहराच्या लगत असलेल्या चोळई गावाजवळ आज दुपारच्या वेळेस कंटेनर गज 10 टीव्ही 6550 सदरचा कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली.
सुदैवाने कोणतीही जीवित आणि झाली नाही या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
या घटनेमुळे प्रवाशांना प्रचंड अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलिस आणि महामार्ग प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासना कडून करण्यात आले आहे.
Mumbai Rain News: कोसळधारमुळे मुंबईची झाली तुंबई! रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम, धडकी भरवणारे 25 PHOTOS
Mumbai Rain Photos: सलग तिसऱ्या दिवशी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईमध्ये ठिकठिकाणी पाणी साचलंय.

Live News: विहार तलाव आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला
मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला आहे.
Live Update: मिठी नदीत पाच जण बुडाले, चार जणांना वाचवण्यात यश
मिठी नदीत पोहण्यासाठी पाच तरुणांनी उडी मारली. ते पाचही जण बुडाले. त्यातील चार जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर एक जण बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्याचं काम सुरू आहे.
Rain Update: मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये 10 ते 15 फूट पाणी साचले
महाराष्ट्र नगर, मानखुर्द बोगदा (ट्रॉम्बे) येथे अंदाजे दहा ते पंधरा फूट पाणी साचले असून बोगदा वाहतुकीस बंद करण्यात आलेला आहे.
Rian Update: लातूरमध्ये मुसळधार पावसामुळे माती खचून झाडे पडली तर ऊसही झाला आडवा
लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आल्याचे पहायला मिळत आहे तर शेती पीकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी माती खचुन झाडं आडवी पडली असल्यामुळे रस्ते बंद झाले आहेत. शेतीतला उस आडवा पडला आहे तर हाता तोंडाशी आलेली उडीद आणि मुगाची पिकं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Rian Update: रत्नागिरीच्या आंबा घाटातील वाहतूक अखेर सुरू
रत्नागिरी आंबा घाटातील वाहतूक अखेर सुरू
दरड हटविण्यात यश
तीन तासानंतर वाहतूक सुरू
रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट
तीन तास वाहतुकीचा झाला होता खोळंबा
Rain Updte : हिंगोली जिल्ह्यात पावसाचा थैमान, कयाधू नदीला पूर
हिंगोली जिल्ह्यात पावसाचा थैमान, कयाधू नदीला पूर, शेती पिकांचं अतोनात नुकसान..
जिल्ह्यातील 22 मंडळांमध्ये अतिवृष्टी,शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून पावसान थैमान घातला आहे, या पावसामुळे जिल्ह्यातील कयाधू नदी दुथडी भरून वाहत आहे, जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या ओढ्यांना देखील पूर आला आहे त्यामुळे खरीप हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.
Rain News : सावित्री नदीने ओलांडली धोका पातळी
सावित्री नदीने ओलांडली धोका पातळी
महाड शहराला पुराचा धोका, भोंगा वाजून प्रशासनाने दिला सतर्कतेचा इशारा
शहरातील सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात, दस्तुरी नाकारोड पाण्याखाली.
तालुक्यातील सांदोशी विभागात पुलावरून पाणी दोन गावांचा संपर्क तुटला
दरडग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा
Rain Update: चंद्रपुरात मुसळधार पावसाला सुरुवात
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन चार दिवसांपासून पडणारा पाऊस आज सलग येऊ लागल्याने चंद्रपूर शहरातील नागरिकांची त्रेधा उडाली आहे. सखल भागात पाणी साचू लागले असून, रस्त्यांवरही पावसाचे पाणी आले आहे. दुसरीकडे, वर्धा नदीला पूर आल्याने चंद्रपुरातून कोरपनाकडे जाणारा भोयेगाव मार्ग आणि बल्लारपूर राजुरा मार्ग बंद झाला. त्यामुळे तेलंगणाची वाहतूक ठप्प झाली. परिणामी उलटा दाब निर्माण होऊन इरईचे पाणी चंद्रपूर शहरात घुसू शकते. यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Rain Update: पुणे जिल्ह्यातील धरणांमधून विसर्गात वाढ
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर ओघ वाढला आहे. यामुळे नीरा व भाटघर धरणांतून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे.वीर धरण पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या पर्जन्यमानामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणातून ६२३८ क्यूसेक इतक्या दाबाने पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आला असून यामध्ये कमी अधिक प्रमाणात वाढ केली जाऊ शकते.
Rain Updte: पुणे सातारा घाट सेक्शनमध्ये पावसाची सर्वाधिक तिव्रता
पुणे सातारा घाट सेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात रेड अलर्ट आहे. या भागात पावसाची तिव्रता जास्त आहे.
Rain Update: कर्नाटक सरकारबरोबर अलमट्टी बाबत चर्चा
पुण्यात सर्व धरणामध्ये चांगला पाणी साठा आहे. पण इशारा पातळीवर नाही. अलमट्टीचा धोका पाहाता कर्नाटक बरोबर चर्चा सुरू आहे. इसीएस लेवलवर ती चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एक इंजिनिअर चोवीस तास संपर्कात आहे. कर्नाटक सरकारने धरणाच्या पाण्याची पातळी राखली आहे. त्यामुळे सध्या धोका नाही. त्यांनी विसर्ग केला पाहीजे त्या नुसार चर्चा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापूर सांगली या भागाला दिलासा मिळणार आहे.
Rain Update: नाशिक विभागात जवळगावमध्ये सर्वाधिक नुकसान
नाशिकमध्ये तापी आणि हातूनरला मोठ्या प्रमाणात पाणी आहे. रावेरमध्ये जास्त पाणी शिरलं आहे. जळगाव जिल्ह्याला सर्वात जास्त पावसाचा फटका बसला आहे. दोन दिवसापासून त्या ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
Rain Updte: कोकणात रेड अलर्ट
कोकणात रेड अलर्ट आहे. जगबुडी, अंबा, कुंडलीका नदी इशारा पातळीपर्यंत पोहोचली आहे. वाशिष्टीमुळे चिपळूणमध्ये पूर स्थिती निर्माण होते. तिथेही पूर पातळीवर नजर ठेवण्यात आली आहे. उपाय योजना करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Rain update: 18 ते 21 ऑगस्टला अनेक भागात अतिवृष्टीची शक्यता
18 ते 21 ऑगस्टला अनेक भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. जळपास 15 ते 16 जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Mumbai Rain LIVE Updates: कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात साचले पाणी
कल्याण डोंबिवलीत रात्रपासून मुसळधार पाऊस पडत आहे.सततच्या पावसामुळे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवर पाणी साचलं आहे.नागरिक तसेच वाहनचालकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच चेंबूर मध्ये पालिकेच्या मा रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत पाणी भरले. चेंबूर मध्ये पालिकेच्या मा रुग्णालयात मोठ्या प्रमाणांत पाणी भरले आहे. यामुळे रुग्णांना सुमारे चार ते पाच फूट पाण्यातून वाट काढत रुग्णालयात जावे लागत आहे.
Mumbai Rain Metro Status LIVE Updates: लोकल ठप्प, रस्ते बंद, मुंबईमधील मेट्रोची स्थिती काय?
मुंबईला संततधार पावसानं झोडपलं असल्यानं अनेक वाहतुकीची साधन पावसामुळे खोळंबली आहेत. रस्ते पाण्याने भरल्याने बस सेवा तसेच ट्रेन सेवा ही धिम्यागतीने चालत आहेत मात्र मुंबई मेट्रो ची मार्गिका मेट्रो २ ए आणि ७ या मात्र सुरळीत विना विलंब सुरू आहेत. दोन्ही मार्गिका या उन्नत मार्गावर धावत असल्याने रस्त्यांवर साचलेल्या पाण्याचा किंवा संततधार पावसाचा कुठलाही अडथळा येत नसल्याने मेट्रोच्या सेवा सुरळीत. मेट्रो २ ए अंधेरी पश्चिम ते दहिसर पश्चिम तर मेट्रो ७ अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या दरम्यान धावत आहे.
Mumbai Rain Local Status: घाटकोपर- कुर्ला स्थानकांमधी अप मार्गावर वाहतूक ठप्प
घाटकोपर आणि कुर्ला यांच्यामध्ये अप मार्गावर वाहतूक ठप्प आहे. गेल्या २५ मिनिटांपासून गाडी एकाच ठिकाणी उभी आहे. तर कुर्ला स्थानकातही रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने गाड्यांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
Raigad Rain Update: रायगडला पावसाचा रेड अलर्ट
दक्षिण रायगड जिल्ह्यात गेल्या काही तीनदिवसा पासून पावसाचा जोर वाढला असून अनेक तालुक्यांत मुसळधार पावसाने परिस्थिती गंभीर केली आहे. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पावसामुळे नद्यांचा पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे
Mumbai Rain LIVE Updates: पावसाचा फटका, पूर्व ईस्टर्न एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी
पावसाचं मोठा फटका पूर्व द्रुतगती मार्गला बसला आहे. विक्रोळी ते चुनाभट्टी पर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. जोरदार पाऊस यामुळे रस्त्यावर भरलेले पाणी याचा मोठा फटका पूर्व द्रुतगती मार्गला बसला आहे.
Mumbai Rain LIVE Updates: गोरेगाव मोरबा रोडवर वडवली भागात रस्त्यांवर पाणी, अनेक रस्ते बंद
गोरेगाव मोरबा रोडवर वडवली भागातील अनेक रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते बंद.
वडवली कोंड, वडवली दर्गा, वडवली मोरबा रस्ता बंद.
सावित्री नदी किनारी भागातील गावामध्ये पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ.
यातच रेड अलर्ट अगोदर जाहीर करूनही शाळांना सुट्ट्या न दिल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आला आहे.
Mumbai Rain LIVE Updates: पावसामुळे परिस्थीती गंभीर, मुंबई पोलीस खंबीर!
परिस्थिती गंभीर, मुंबई पोलीस खंबीर!
Maharashtra Rain LIVE Update: श्रीवर्धन तालुक्यात जोरदार पाऊस, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
रायगडच्या दक्षिण भागामधील श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड परिसरात देखील मुसळधार पाऊस कोसळतोय.
श्रीवर्धन व म्हसळा बाजारपेठेत पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. समुद्रात देखील पाण्याला उधाण असल्यामुळे समुद्रकिनारी भागातील नागरिकांना आणि मच्छीमार बांधवांना जिल्हा प्रशासनाकडून घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
छोट्या मोठ्या ओढ्यांच्या पाण्यात देखील कमालीची वाढ झाल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सुरक्षित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Mumbai Rain: मुंबईत सकाळपासून सर्वाधिक पाऊस झालेली ठिकाणे
मुंबईतील आज सकाळपासून सर्वाधिक नोंद झालेली ठिकाणे:
Mumbai Rain BEST Route Changes: मुंबईतील पावसाचा बस वाहतुकीवर परिणाम! बेस्ट वाहतुकीत मोठे बदल
मुंबईतील तुफान पावसामुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. काही सखल भागात पाणी साचल्याने बेस्ट परिवहन उपक्रमाच्या बसेसचे वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :
१) शेल वसाहत, चेंबूर येथील वाहतूक चेंबूर नाका येथून परावर्तित
२) गांधी मार्केट, शीव येथील वाहतूक भाऊ दाजी मार्ग येथून परावर्तित
३) शिवसृष्टी /नेहरू नगर एसटी आगार, कुर्ला येथील वाहतूक एस. जी. बर्वे नगर मार्ग येथून परावर्तित
४) संगम नगर, वडाळा येथील वाहतूक हनुमान मंदिर येथून परावर्तित
५) सीजीएस वसाहत, अँटॉप हिल येथील वाहतूक शेख मिस्त्री दर्गा येथून परावर्तित
६) आर. सी. एफ. रेल्वे पूल (चेंबूर) येथील वाहतूक आर. सी. मार्ग येथून परावर्तित
७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, हिंदमाता येथील वाहतूक भोईवाडा येथून परावर्तित
Mumbai Rain Updates: चेंबूर मधील कोस्टल कॉलनी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याखाली
चेंबूर मधील कोस्टल कॉलनी पावसाच्या पाण्यामुळे पाण्याखाली
चार ते पाच फुट पाणी या संपूर्ण कॉलनीत
येथील रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत
Mumbai Rain LIVE Updates: रायगड जिल्ह्यातही तुफान पाऊस
जिल्ह्यात खोपोली, खालापूर, कर्जत, पेण, रोहा, सुधागड, अलिबाग, मुरुड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस.
पहाटे पासून सतत पाऊस..
माणगाव तालुक्यातील गोरेगाव भागात जोरदार पाऊस.
Maharashtra Rain: उदगीर तालुक्यात पावसाचा हाहाकार,पुराच्या पाण्याचे थैमान
उदगीर तालुक्यात अक्षरशा ढगफुटी सदस्य पाऊस झालाय बऱ्याच गावांचा संपर्क सुद्धा तुटलेला आहे गावांमध्ये पाणी शिरलेला आहे तर मुक्रमाबाद परिसरातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. शेतीच्या बरोबरीनेच वीस म्हशी वाहून गेल्या आहेत.शेतीचं अनेक जणांचं साहित्य सुद्धा पुरामध्ये पाहून गेला आहे तर अनेक जणांची जनावर वाहून गेली आहे त्याचा शोध घेणं सुरू आहे लातूर कर्नाटकच्या सीमा वरती भागातील बोरगाव या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे
Maharashtra Rain: गोदावरी नदीची पातळी वाढली, मंदिरं गेली पाण्याखाली!
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गंगाखेड शहरातून जाणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून वैष्णव घाट, नरसिंह घाट या दोन्ही घाट परिसरात असलेली मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत, या परिसरात असलेले नरसिंह मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर, कृष्ण मंदिर, हनुमान मंदिर हे पाण्याखाली गेले आहेत पाण्याचं हे रौद्ररूप पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत...
Amba Ghat Landslide: आंबा घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्प
आंबा घाटात कोसळली दरड
दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणारा महत्वाचा घाट
मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामाचा आंबा घाटाला फटका
ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु
वाहतूक पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार
Mumbai Rain LIVE Updates: कुठे पाणी साचलं? कुठे वाहतूक ठप्प? वाचा..
पाणी साठलेली ठिकाणे:
दादर हिंदमाता, वडाळा चाररस्ता, सायन, वरळी नाका,माटुंगा गांधी मार्केट, कुर्ला स्टेशन परिसर, चेंबूर मार्केट, अंधेरी सबवे, माटुंगा पूर्व
वाहतूक कोंडी:
चेंबूर सुमन नगर जंक्शन, दादर प्लाझा,किंग्ज सर्कल, सायन-पनवेल हायवे, ईस्टर्न फ्री-वे, वेस्टर्न एक्सप्रेस वे, एलबीएस रोड
Mumbai Weather Update Red Alert: कोकणासह मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट जारी
१८ ऑगस्ट, कोकणात, मुंबई ठाणे आणि घाट भागात पुढील दोन दिवसांसाठी अतिवृष्टीसह अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
Mumbai Local Train Status: रेल्वे रुळांवर पाणीच पाणी, हार्बर लाईनवरील गाड्या उशिराने धावणार
मानखुर्द, गोवंडी, कुर्ला आणि टिळक नगर येथे मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे हार्बर रेल्वे मार्गावरील सेवा थोड्या विलंबाने सुरू आहेत. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
Pune Rain LIVE Updates: पुणेकरांनो, काळजी घ्या! हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
आज दिनांक 18/08/2025 रोजी पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत सोलापूर, सातारा, पुणे , कोल्हापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
Mumbai Rain LIVE Updates: सायन स्टेशनवरील पटरीवर पाणीच पाणी, मध्य रेल्वेला फटका
सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून मुंबईतील सायन स्टेशन वरती पटरी वर पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि याचा फटाका मध्य रेल्वे वरती देखील पडताना दिसून येत आहे,.
Washim News: वाशिम जिल्ह्यातील पैन गंगा नदीच्या पुरात होणार मोठी वाढ
वाशिम जिल्ह्यातील पैन गंगा नदीच्या पुरात होणार मोठी वाढ...
नदी क्षेत्रात पडत असलेला सतत चा मुसळधार पाऊस आणि नदी वरील पेन टाकळी प्रकल्पातुन करण्यात येत आहे पाण्याचा विसर्ग...
बुलढाणा जिल्ह्यातील पेन टाकळी प्रकल्प 84.38 टक्के भरल्यानं तसेच सतत आवक होत असल्यानं प्रकल्पाची 9 द्वारं 30 सेंटी मीटर ने उघडून त्यातून पैन गंगा नदी पात्रात करण्यात येत आहे 9 हजार 689 कुसेक्स एवढा पाणी विसर्ग...
Maharashtra Rain: नांदेड, लातूर जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत, CM घेणार मराठवाड्यातील पावसाचा आढावा
मुख्यमंत्री घेणार मराठवाड्यातील पावसाचा आढावा
वाजता मुख्यमंत्री यांची मराठवाडा विभागीय आयुक्तांसोबत ऑनलाइन बैठक
नांदेड, लातूर जिल्ह्यातील पावसामुळे जनजीवन विस्कळीत
Mumbai Rain LIVE Updates: दादरमधील रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, एलबीएसवरुन ठाण्याकडे जाणारी वाहतूक बंद
मुंबईच्या कांजूर विभागात मोठ्या प्रमाणात एल बी एस मार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे एलबीएस वरून ठाणे कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच दादर रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेला असून कुर्ला पूर्वमधील रस्त्यांवरही पाणीच पाणी पाहायला मिळत आहे.
Mumbai Rain LIVE Updates: पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी, मुंबई पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ईस्टर्न फ्रीवर वाहनांच्या रांगा
मुंबईत पावसाचा जोर वाढत आहे , मागील काही तासापासून संततधार सुरू असल्याने वाहतूक कोंडी चा सामना मुंबई कराना करावा लागत आहे . मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. मुंबई पूर्व द्रुतगती महामार्ग आणि ईस्टर्न फ्री वे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणात झाली आहे
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईत मुसळधार सुरुच: शाळांना सुट्टी जाहीर
मुंबईत पावसाचा वाढता जोर पाहून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रातील मुलांना सुखरुप घरी सोडा असे निर्देश देत दुपारील सत्राच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Mumbai Rain LIVE Updates:तुफान पावसामुळे तारांबळ, मुंबईकरांच्या सेवेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासन सज्ज!
तुफान पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ, मुंबईकरांच्या सेवेसाठी पश्चिम रेल्वे प्रशासन सज्ज!
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईकरांनो, काळजी घ्या, सतर्क रहा!
मुंबईकरांनो, काळजी घ्या..
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा महत्त्वाची! मुंबई पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन
प्रिय मुंबईकरांनो,
ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुसळधार पाऊस सुरू असल्याने, अनेक भागात पाणी साचण्याच्या आणि दृश्यमानता कमी होण्याच्या घटना घडत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कृपया अनावश्यक प्रवास टाळा, काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करा आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा.
आमचे अधिकारी आणि कर्मचारी उच्च सतर्क आहेत आणि मदत करण्यास तयार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, कृपया १०० / ११२ / १०३ वर कॉल करा. तुमची सुरक्षितता नेहमीच प्रथम येते.
मुंबई, पोलीस आयुक्तांची पोस्ट
Mumnai Rain LIVE Updates: मुंबईकरांनो आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, तीन- चार तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याने आज सकाळी १० वाजता दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
⚠️🌧️ या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे.
📞 आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १९१६ या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.
Veer Dam Water Level Update: वीर धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नीरा नदीच्या पात्रात १८०० cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार असून सदर विसर्गात दुपारी 12 वाजता वाढ करून तो 6238 क्यूसेक्स इतका करण्यात येणार आहे.
निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.
(टीप - पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे)
Mumbai Rain LIVE Updates: सायनमधील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले, वाहनचालकांना त्रास
मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना त्रास होत आहे.
Mumbai Rain LIVE Updates: उदंचन केंद्र येथील सातही पंप सुरू, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न
Mumbai Rain LIVE Updates: हिंदमाता परिसरात पाणी साचले, वाहन चालकांची तारांबळ
मुंबईतील दादर येथील हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, इथे पाणी साचू नये यासाठी 7 पंप कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मात्र तरीही इथे पाणी साचताना दिसत असून वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.
Mumbai Rain LIVE Updates: दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे वडाळ्यात रस्त्यावर पाणी साचले असून अंधेरी जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात तुफान पाऊस बरसत आहे.
Washim Rain: वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार, एका गावाचा संपर्क तुटला
रिसोड तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे कोयाळी (बु) गावाचा संपर्क तुटला आहे. गावाला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पूरस्थितीमुळे शेतशिवारातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Maharashtra LIVE Blog: रायगड जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस
जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस.
सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.
कुंडलिका, आंबा, सावित्री, पातळगंगा, उल्हास सह सर्व नद्या सामान्य परिस्थितीत.
Maharashtra Rain LIVE Updates: गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 38 मंडळात अतिवृष्टीची नोंद
गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 38 मंडळात अतिवृष्टीची नोंद
बीड जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टीची नोंद
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी
जालना जिल्ह्यातील 3 मंडळात अतिवृष्टीची नोंद
लातूर जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद
नांदेड जिल्ह्यात 5 आणि परभणी जिल्ह्यातील 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे
Maharashtra Rain LIVE Updates: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी ब्रिजला लागलं बावनदीचं पाणी
शेती तसेच बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी
खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी
जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर, सध्याची पाणीपातळी 7.20 मीटर
संगमेश्वरमधील शास्त्री नदीने ओलांडली इशारा पातळी
राजापूरमधील कोदवली नदीनेही ओलांडली इशारा पातळी
प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा
Mumbai Rain LIVE Updates: हिंदमाता परिसरात पाणी साचलं, पालिकेकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु
पावसामुळे हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी हिंदमाता उदंचन केंद्र येथील सातही पंप कार्यान्वित आहेत. सध्या परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.
Mumbai Rain LIVE Updates: अंधेरी सब- वे वाहतुकीसाठी बंद, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबईतील जोरदार पावसामुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पाणी साचल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहने संथ गतीने येत आहेत.
Mumbai Rain LIVE Updates: पुढील चार तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी
पुढील काही दिवसांत मुंबई आणि शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये 'जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कामासाठी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Mumbai Rain LIVE Updates: मुंबईतील पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम
शहराची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल सेवा पावसामुळे मंदावली आहे. लोकल ट्रेन सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.
Mumbai LIVE Updates: मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता
Mumbai Rain LIVE: मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता
Mumbai Rain LIVE: पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! अनेक गाड्या उशिरा
पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! अनेक गाड्या उशिरा
उपनगरीय गाड्यांचे लाईव्ह अपडेट!!
पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद गाड्या, २ मिनिटे उशिराने तर स्लो गाड्या १ मिनिटे उशिरा धावत आहेत.
तसेच मध्य रेल्वेेवरील कल्याणवरुन जाणाऱ्या जलद गाड्या १० मिनिटे उशिरा तर स्लो गाड्या ४ मिनिटे उशिरा..
मध्य रेल्वेच्या सीएसटीवरुन सुटणाऱ्या जलद गाड्या ८ मिनिटे उशिरा तर स्लो गाड्या ९ मिनिटे उशिरा धावत आहेत.
सीएसटीवरुन हार्बर लाईन १० मिनिटे उशिरा तर पनवेल मार्गावरुन चार मिनिटे उशिरा धावत आहेत.