जाहिरात
4 minutes ago

Mumbai Rain Live Updates:   मुंबई, पुण्यासह राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. विदर्भ, मराठवाड्यासह रायगड जिल्ह्यामध्येही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी मुंबईमध्ये पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. पावसाच्या हजेरीमुळे लोकल सेवेवरही परिणाम झाला असून आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. 

Mumbai Rain LIVE Updates: मुंबईकरांनो, तुमची सुरक्षा महत्त्वाची! मुंबई पोलीस आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

प्रिय मुंबईकरांनो,

ऑरेंज अलर्ट अंतर्गत मुसळधार पाऊस सुरू असल्याने, अनेक भागात पाणी साचण्याच्या आणि दृश्यमानता कमी होण्याच्या घटना घडत असल्याने सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कृपया अनावश्यक प्रवास टाळा, काळजीपूर्वक प्रवासाचे नियोजन करा आणि आवश्यक असल्यासच बाहेर पडा.

आमचे अधिकारी आणि कर्मचारी उच्च सतर्क आहेत आणि मदत करण्यास तयार आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, कृपया १०० / ११२ / १०३ वर कॉल करा. तुमची सुरक्षितता नेहमीच प्रथम येते.

मुंबई, पोलीस आयुक्तांची पोस्ट

Mumnai Rain LIVE Updates: मुंबईकरांनो आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा, तीन- चार तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज सकाळी १० वाजता दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरात पुढील तीन ते चार तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

⚠️🌧️ या पार्श्वभूमीवर, सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की योग्य ती काळजी घ्यावी. आवश्यकता नसेल तर कृपया घराबाहेर पडणे टाळावे.

📞 आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षातील १९१६ या मदत सेवा क्रमांकावर कृपया संपर्क साधावा.

Veer Dam Water Level Update: वीर धरणातून मोठा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने दि.१८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता  नीरा नदीच्या पात्रात  १८०० cusecs विसर्ग सुरू करण्यात येणार असून सदर विसर्गात दुपारी 12 वाजता वाढ करून तो  6238 क्यूसेक्स इतका करण्यात येणार आहे.

निरा नदीच्या दोन्ही तिरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी.

(टीप - पाण्याची आवक व पावसाचे प्रमाण लक्षात घेता नदीपात्रातील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे)

Mumbai Rain LIVE Updates: सायनमधील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले, वाहनचालकांना त्रास

मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट परिसरात पाणी साचले असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालकांना त्रास होत आहे.

Mumbai Rain LIVE Updates: उदंचन केंद्र येथील सातही पंप सुरू, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न

Mumbai Rain LIVE Updates: हिंदमाता परिसरात पाणी साचले, वाहन चालकांची तारांबळ

मुंबईतील दादर येथील हिंदमाता परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून, इथे पाणी साचू नये यासाठी 7 पंप कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. मात्र तरीही इथे पाणी साचताना दिसत असून वाहनचालकांना या पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे.

Mumbai Rain LIVE Updates: दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. दादरमध्ये रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. दुसरीकडे वडाळ्यात रस्त्यावर पाणी साचले असून अंधेरी जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात तुफान पाऊस बरसत आहे. 

Washim Rain: वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार, एका गावाचा संपर्क तुटला

रिसोड तालुक्यातील सततच्या अतिवृष्टीमुळे कोयाळी (बु) गावाचा संपर्क तुटला आहे. गावाला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पूरस्थितीमुळे शेतशिवारातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Maharashtra LIVE Blog: रायगड जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस.

सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत.

कुंडलिका, आंबा, सावित्री, पातळगंगा, उल्हास सह सर्व नद्या सामान्य परिस्थितीत.

Maharashtra Rain LIVE Updates: गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 38 मंडळात अतिवृष्टीची नोंद

गेल्या 24 तासात मराठवाड्यातील 38 मंडळात अतिवृष्टीची नोंद

बीड जिल्ह्यातील 14 मंडळात अतिवृष्टीची नोंद

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी

जालना जिल्ह्यातील 3 मंडळात अतिवृष्टीची नोंद

लातूर जिल्ह्यातील 11 मंडळात अतिवृष्टीची नोंद

नांदेड जिल्ह्यात 5 आणि परभणी जिल्ह्यातील 4 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे

Maharashtra Rain LIVE Updates: मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाणी पातळीत वाढ

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

संगमेश्वर तालुक्यातील परचुरी ब्रिजला लागलं बावनदीचं पाणी 

शेती तसेच बागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी

खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोका पातळी

जगबुडी नदीची धोका पातळी 7 मीटर, सध्याची पाणीपातळी 7.20 मीटर

संगमेश्वरमधील शास्त्री नदीने ओलांडली इशारा पातळी

राजापूरमधील कोदवली नदीनेही ओलांडली इशारा पातळी

प्रशासनाकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा

Mumbai Rain LIVE Updates: हिंदमाता परिसरात पाणी साचलं, पालिकेकडून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु

पावसामुळे हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. हिंदमाता परिसरातील पावसाचे पाणी उपसा करण्यासाठी हिंदमाता उदंचन केंद्र येथील सातही पंप कार्यान्वित आहेत. सध्या परिसरातील वाहतूक सुरळीत सुरू आहे.



Mumbai Rain LIVE Updates: अंधेरी सब- वे वाहतुकीसाठी बंद, पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबईतील जोरदार  पावसामुळे वाहतूक सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. पाणी साचल्याने अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहने संथ गतीने येत आहेत. 

Mumbai Rain LIVE Updates: पुढील चार तास महत्त्वाचे! हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पुढील काही दिवसांत मुंबई आणि शेजारील पालघर, ठाणे जिल्ह्यांमध्ये 'जोरदार पाऊस' पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी कामासाठी बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai Rain LIVE Updates: मुंबईतील पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम

शहराची लाईफलाईन समजली जाणारी मुंबई लोकल सेवा पावसामुळे मंदावली आहे. लोकल ट्रेन सुमारे 15 ते 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ज्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Mumbai LIVE Updates: मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता



Mumbai Rain LIVE: मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता

Mumbai Rain LIVE: पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! अनेक गाड्या उशिरा

पहिल्याच दिवशी लोकलचा खोळंबा! अनेक गाड्या उशिरा

उपनगरीय गाड्यांचे लाईव्ह अपडेट!!

पश्चिम रेल्वे मार्गावरील जलद गाड्या, २ मिनिटे उशिराने तर स्लो गाड्या १ मिनिटे उशिरा धावत आहेत.

तसेच मध्य रेल्वेेवरील कल्याणवरुन जाणाऱ्या जलद गाड्या १० मिनिटे उशिरा तर स्लो गाड्या ४ मिनिटे उशिरा..

मध्य रेल्वेच्या सीएसटीवरुन सुटणाऱ्या जलद गाड्या ८ मिनिटे उशिरा तर स्लो गाड्या ९ मिनिटे उशिरा धावत आहेत.

सीएसटीवरुन हार्बर लाईन १० मिनिटे उशिरा तर पनवेल मार्गावरुन चार मिनिटे उशिरा धावत आहेत. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com