शिवसैनिकाच्या हत्येचा आरोपी, 9 वर्षानंतर जेल बाहेर, शिवसैनिकानेच केले स्वागत, नक्की काय घडलं?

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

रमेश उर्फ पप्पू गुंजाळ हे अंबरनाथचे शिवसेनेचे नगरसेवक होते. 2015 साली त्यांची त्यांच्या घरा शेजारी हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुरुनाथ उर्फ अण्णा गायकर याला अटक केली होती. तेव्हा पासून तो जेलमध्ये होता. तब्बल 9 वर्षानंतर त्याला जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतर जेल बाहेर त्याचे स्वागत करण्यासाठी एकच गर्दी झाली होती. मात्र  शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख महेश पाटील हे देखील त्याच्या स्वागतासाठी जेल बाहेर आले होते. याचा एक व्हीडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पाटील यांच्या कृत्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या. एका शिवसैनिकाच्या खुनाचा आरोप असलेल्या आरोपीच्या स्वागताला दुसरा शिवसैनिक पोहचतो हे पाहून  अंबरनाथमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुरुनाथ उर्फ अण्णा गायकर हा गुंजाळ यांच्या हत्ये प्रकरणात जेलमध्ये होता. त्याला 9 वर्षानंतर जामीन मिळाला. तो जेल बाहेर येणार म्हणटल्यावर त्याच्या पंटर लोकांनी जेलबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यात तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात होता. कुणी हार  आणला होता तर कुणी पुष्पगुच्छ आणले होते. एखादा व्यक्ती मोठी कामगिरी करून, जसा परत येतो आणि त्याचे स्वागत होते तशीच स्वागताची तयारी करण्यात आली होती. पण एक गोष्ट सर्वांना खटकली. ती म्हणजे याच गायकरच्या स्वागतासाठी शिवसेना शिंदेगटाचा नेता आला होता. महेश पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख आहेत. ते गायकर याच्या स्वागतासाठी आले होते. गायकर बाहेर येताच महेश पाटील यांनी त्याला अलिंगण दिले. जसे जणू जिवलग मित्र असल्याचे त्यातून दिसत होते. 

ट्रेंडिंग बातमी -  जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण

या भेटीचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. जेल बाहेल आल्यानंतर गायकरला घेण्यासाठी गाड्यांचा ताफा आला होता. त्यातल्या अलिशान गाडीमध्ये बसून तो त्याच्या घराकडे रवाना झाला. त्याच्याबरोबर महेश पाटील ही होते. घरा बाहेर असलेल्या त्याच्या कार्यालयात त्यांना गाठीभेटीही घेतल्या. यावेळी पाटील आणि गायकर याच्या हस्यविनोद होतानाही दिसत आहे. मात्र ज्या शिवसैनिकाची हत्या झाली त्याच्याच स्वागताला दुसरा शिवसैनिक गेल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शिवाय विधानसभा निवडणूक या तोंडावर आहेत. या पार्श्वभूमीवरही गायकर याला आता जामीन कसा मिळाला याचीही चर्चा आता रंगली आहे. 


 

Advertisement