Nagpur Crime: मुलींच्या कराटे संघासोबत ट्रेनमध्ये भयंकर प्रकार! असहाय्य मुलींचा आक्रोश, रेल्वे पोलिसांवर संताप

मुलींनी पालकांशी संपर्क साधला आणि या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण करून आपल्या कुटुंबाला पाठवले. रेल्वेतच मुलींनी हंबरडा फोडून आपली आपबिती सांगितली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Crime:  नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत धावत्या रेल्वेत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  रविवारी सकाळी फलकनुमा एक्स्प्रेसने बालासोरच्या दिशेने प्रवास सुरू असताना काही उनाड तरुणांच्या एका गटाने मुलींची छेड काढली. या तरुणांनी मुलींवर अश्लाघ्य शेरेबाजी केली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाईस विलंब केल्याने संताप होत आहे.

कराटे संघातील विद्यार्थिनीसोबत गैरप्रकार 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ओडिशामधील बालासोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मुलींचा कराटे संघ रवाना झाला होता. रविवारी सकाळी भुवनेश्वर रेल्वे स्थानकावर बालासोर कडे रवाना होण्यासाठी 'फलकनुमा एक्स्प्रेस' ही गाडी क्रमांक १२७०४ पकडली. रविवारी सकाळी फलकनुमा एक्स्प्रेसने बालासोरच्या दिशेने प्रवास सुरू असताना, काही उनाड तरुणांच्या एका गटाने मुलींची छेड काढली. या तरुणांनी मुलींवर अश्लाघ्य शेरेबाजी केली.

Advertisement

Chhatrapati Sambhajinagar: रील स्टारचा क्रूर चेहरा! 50 लाखांसाठी निवृत्त प्राध्यापकाची हत्या; 40 दिवसांनी छडा

नागपूर विद्यापीठाने या १०-१२ मुलींच्या संघासोबत एक महिला आणि एक पुरुष प्रशिक्षक दिले होते. मात्र, हे दोन्ही प्रशिक्षक वेगळ्या बोगीमध्ये बसले असल्याने  आणि मुली रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या असल्याने हा प्रकार घडला. छेडछाड सुरू असताना घाबरलेल्या काही मुलींनी आपल्या पालकांशी संपर्क साधला आणि या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण करून आपल्या कुटुंबाला पाठवले. रेल्वेतच मुलींनी हंबरडा फोडून आपली आपबिती सांगितली.

रेल्वे पोलिसांची दिरंगाई 

दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाला (RPF) या प्रकरणाची माहिती फोनवरून देण्यात आली, परंतु ते त्वरित पोहोचले नाहीत असा आरोप पालकांनी केला आहे. अखेर पुढील स्थानकावर रेल्वे पोलिसांनी या उनाड तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांना रेल्वेतून खाली उतरवले. या धक्कादायक प्रकाराने पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

Odisha Fire: मोठी दुर्घटना! रुग्णालयातील ICU विभागात भीषण आग, 10 रुग्णांचा मृत्यू

Topics mentioned in this article