- नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची लांबी ८०२ किलोमीटरवरून ८५६ किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे
- सातारा जिल्हा या महामार्गात समाविष्ट करण्यात आला असून गोंदवले आणि शिखर शिंगणापूर भागातून मार्ग जाणार आहे
- या महामार्गामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या प्रदेशांतील कनेक्टिव्हिटी मजबूत होईल
Exclusive News: नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता या महामार्गाची लांबी 856 किमीपर्यंत वाढली आहे. मंत्रिमंडळाच्या ताज्या निर्णयानुसार, या प्रकल्पात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च आता 80 हजार कोटींवरून थेट 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शक्तिपीठ महामार्गाची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने या महामार्गाच्या नव्या आराखड्याला मंजुरी दिली असून, आता या मार्गाची लांबी 54 किमीने वाढली आहे. 1 एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या 1 लाख कोटींच्या वाढीव खर्चाला 'ग्रीन सिग्नल' देण्यात आला आहे.
नव्या आरेखनानुसार (Alignment), सातारा जिल्ह्यातील गोंदवले आणि शिखर शिंगणापूर या भागातून 40 किमीचा मार्ग जाणार आहे. या बदलामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्याशी असलेली कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होणार आहे. सातारा सोडून नांदेड, हिंगोली, परभणी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील मार्गांमध्येही काही तांत्रिक बदल सुचवण्यात आले आहेत. साताऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदवले आणि शिखर शिंगणापूरमधून आता हा महामार्ग जाणार आहे. साताऱ्यात या महामार्गाची लांबी 40 किमी असेल. यामुळे सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरच्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट गोव्याशी जोडणारा हा सर्वात मोठा महामार्ग ठरणार आहे.
हा महामार्ग केवळ दळणवळणाचे साधन नसून 21 धार्मिक स्थळांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. वर्धा, यवतमाळपासून सुरू होणारा हा प्रवास सिंधुदुर्गपर्यंत एकूण 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा हा मार्ग विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या तिन्ही विभागांच्या विकासासाठी गेमचेंजर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.साताऱ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गोंदवले आणि शिखर शिंगणापूरमधून आता हा महामार्ग जाणार आहे. साताऱ्यात या महामार्गाची लांबी 40 किमी असेल. यामुळे सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरच्या प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट गोव्याशी जोडणारा हा सर्वात मोठा महामार्ग ठरणार आहे.
या महामार्गामुळे विठ्ठल रुक्मिणी मंदिर (पंढरपूर), अंबाबाई मंदिर (कोल्हापूर) यांसारख्या 21 महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणे सुलभ होईल. हा महामार्ग वर्धा, लातूर, धाराशिव आणि सिंधुदुर्ग अशा 13 जिल्ह्यांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणणार आहे. नुकताच नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी राज्य सरकारने नवा आराखडा मंजूर केला आहे. या सुधारित आराखड्यामुळे मार्गाची लांबी आणि खर्च दोन्ही वाढणार आहेत. 1 एप्रिल रोजी राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला असून, महामार्गाची लांबी 802.592 किमीवरून 856.765 किमीपर्यंत वाढणार आहे. तसेच, प्रकल्पाचा खर्च 80 हजार कोटी रुपयांवरून 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. नव्या मार्गानुसार हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतून जाणार आहे. यामुळे एकूण 21 धार्मिक स्थळे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत.