Railway News: कोकणवासीयांसाठी गूड न्यूज! 'ही' द्विसाप्ताहिक गाडी नियमित धावणार; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

मे महिन्याच्या सुट्टीत आणि भविष्यातही कोकणात येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आजपासून  ही रेल्वे नियमित धावणार आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

राकेश गुडेकर, रत्नागिरी:

Nagpur Madgaon Goa Biweekly Train Regular:  कोकणात जाणाऱ्या आणि विदर्भाला जोडणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी घेऊन आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत असलेली नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक विशेष रेल्वे अखेर आजपासून नियमितपणे धावणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची संख्या पाहता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतल्यामुळे चाकरमानी आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Palghar Crime: पालघरमध्ये 'पूजा खेडकर' पॅटर्न! भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा, तरुणी अटकेत

कोकणवासियांना मोठा दिलासा! 

कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या आणि विदर्भाला जोडणाऱ्या प्रवाशांसाठी नागपूर-मडगाव दरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे मे महिन्याच्या सुट्टीत आणि भविष्यातही कोकणात येणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. आजपासून  ही रेल्वे नियमित धावणार आहे. 

Advertisement

त्यामुळे नागपूर-मडगाव-नागपूर ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी आता नागपूर-मडगाव-नागपूर द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस म्हणून ओळखली जाईल. नागपूरहून ही गाडी १६ मे २०२६ पासून, तर मडगाव येथून १७ मे २०२६ पासून नियमितपणे सेवेत रुजू होईल. ही गाडी १६ मे पासून दर बुधवारी आणि शनिवारी नागपूर जंक्शनवरून  दुपारी ३:०५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:४५ वाजता मडगावला पोहोचेल. 

तर १७ मे पासून दर गुरुवारी आणि रविवारी मडगाव येथून रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ९:२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड आणि करमाळी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

Monsoon Date 2026: यंदा मान्यून वेळेआधी... दमदार एन्ट्रीची तारीख ठरली; कधीपर्यंत केरळमध्ये धडकणार?