Nagpur MHADA Scam: म्हाडाच्या घरासाठी अर्ज करताय? सावधान… 150 जणांची फसवणूक, संचालक फरार

एजन्सीसोबतचा म्हाडाने केलेला करार अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आणला आहे, परंतु या एजन्सीचा मुख्य संचालक मात्र फरार झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur MHADA Housing Scam: महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाने घरकुल योजनांच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या एका खासगी एजन्सीने तब्बल १५० हून अधिक लाभार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरमधून समोर आला आहे. ‘डील्स माय प्रॉपर्टी'  नावाच्या या एजन्सीसोबतचा म्हाडाने केलेला करार अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आणला आहे, परंतु या एजन्सीचा मुख्य संचालक मात्र फरार झाला आहे.

नेमकं काय घडलं? 

मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ मध्ये म्हाडाने आपल्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 'डील्स माय प्रॉपर्टी' या एजन्सीची नियुक्ती केली होती. एजन्सीला घरकुलाच्या विक्रीवर साडेतीन टक्के (३.५%) दराने कमिशन दिले जात होते. म्हाडाच्या नियमांनुसार, ज्या लाभार्थ्यांचा घरासाठी सोडतीत नंबर लागला आहे, त्यांना कागदपत्रे जमा करणे, गृहकर्ज मिळवणे (Home Loan) आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एजन्सीने मोफत मदत करायची होती.

Pune News: घराची किंमत 90 लाख पण मिळणार 28 लाखात, कुठे अन् कसा करायचा अर्ज?

एजन्सीला म्हाडाकडून कमिशन मिळत असतानाही, या एजन्सीने १५० हून अधिक पीडित लाभार्थ्यांकडून 'सहकार्य करण्यासाठी' आणि गाळे वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवैधपणे पैशांची मागणी केली आणि लाखो रुपयांची वसुली केली. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, लाभार्थ्यांकडून कागदपत्रे आणि घरासाठी जमा केलेले पैसे या एजन्सीने म्हाडाकडे जमाच केले नाहीत. एजन्सीने घेतलेले लाखो रुपये आपल्याकडेच ठेवल्यामुळे अनेक गरजू लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न भंगले आहे.

लाखो रुपयांची वसुली

एजन्सीने पैसे आणि कागदपत्रे जमा न केल्यामुळे पीडित लाभार्थी वर्षभरापासून म्हाडा (MHADA) आणि एजन्सीच्या कार्यालयाच्या चकरा मारत आहे. 'म्हाडा'कडे तक्रार केल्यावर 'एजन्सी'कडे आणि एजन्सीकडे विचारल्यावर 'म्हाडा'कडे बोट दाखवले जात होते. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल झाले. लाभार्थ्यांच्या वारंवारच्या तक्रारींमुळे अखेर या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. 

Advertisement

नक्की वाचा - Rohit Arya: एन्काऊंटरचा थरार! एकीकडे चर्चा मग थेट बाथरूममध्ये एन्ट्री, त्या अडीच तासात काय काय घडलं?

आतापर्यंत एजन्सीच्या संचालकाविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात  १७ वेगवेगळ्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याशिवाय, म्हाडा व्यवस्थापनानेही एजन्सीच्या संचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच  या एजन्सीसोबतचा करार सप्टेंबर २०२५ मध्ये संपुष्टात आणला आहे. मात्र, करार रद्द होण्यापूर्वीच एजन्सीचा संचालक पैसे घेऊन फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.