Nagpur Election 2026: नागपुरात काँग्रेसची ठाकरे गटासह मुस्लीम लीगला साद; नव्या समीकरणामागे खेळी काय?

स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुस्लीम लीगचा पर्याय आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Nagpur Municiple Corporation Election 2026:  नागपुर महानगर पालिकेमध्ये भाजप- शिवसेना सत्ता स्थापन करणार हे आता स्पष्ट झाले आहे  महानगर पालिकेच्या निवडणुकीत सर्व 151 जागा लढणाऱ्या भाजपने 102,  काँग्रेस पक्षाला 34 तर एकनाथ शिंदे  यांच्या शिवसेनेला 2 जागा मिळाल्या आहेत. अशातच आता नागपूरमध्ये स्वीकृत नगरसेवक मिळवण्यासाठी काँग्रेसने नवी खेळी केली आहे. नागपूर महानगर पालिकेत काँग्रेस आणि उबाठा मुस्लिम लीगला सोबत घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

काँग्रेस मुस्लीम लीगला सोबत घेणार...? 

नागपूर महानगर पालिकेत काँग्रेसचे ३४ नगरसेवक असणार आहेत. काँग्रेसला ३० नगरसेवकांमागे दोन स्वीकृत सदस्य तर मिळतील. दोनचा कोटा पूर्ण झाल्यानंतर काँग्रेसकडे चार नगरसेवक उरतात. त्यामुळे तिसरा स्वीकृत सदस्य देखील पदरात पाडून घेण्यासाठी इतर पक्षांना सोबत घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मुस्लीम लीगचा पर्याय आहे. 

Kalyan News: नवनिर्वाचित नगरसेवकावर बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ, कारण समोर येताच सर्वच जण...

नागपुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक विजयी झाले आहेत.  अशात मुस्लीम लीग सोबत आली तर त्यांचे चार नगरसेवक सुद्धा मिळतील. म्हणजे, काँग्रेसचे उरलेले 4, मुस्लीम लीगचे 4 व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2  सदस्य मिळून दहा सदस्य होतात. या आधारावर तिसरा स्वीकृत सदस्य पदरात पाडून घेऊ शकते, या उद्देशाने प्रयत्न सुरू झाले आहेत. 

आज होणार नगरसेवकांच्या गटाची नोंदणी

दरम्यान, नागपुरातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. नागपूर महानगर पालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या गटाची नोंदणी आज होणार आहे. आज सकाळी दहा वाजता नवनियुक्त गट नेते ज्येष्ठ नगरसेवक संजय महाकाळकर यांच्या सह सर्व 34 नगर सेवक नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात हजर राहणार आहेत. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या पक्षांनी महायुतीत एकत्र निवडणुका लढल्या असल्या तरी मुंबई प्रमाणे वेगवगेळी गट नोंदणी करणार आहेत.

Advertisement

Pune News: राष्ट्रवादीचं विलिनिकरण होणार? बंद दाराआड दोन्ही पवारांची चर्चा काय? हर्षवर्धन पाटील थेट बोलले