- कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत महायुतीने १०३ जागांवर मोठा विजय मिळवला
- रमिज मणियार हे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नगरसेवक असून निवडून आल्यावर त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला
- या निर्णयामुळे रमिज मणियार यांच्यावर बाऊन्सर घेऊन फिरण्याची आता वेळ आली आहे
अमजद खान
महापालिका निवडणुकीत आपल्यासमोर भाजपचा उमेदवार उभा आहे. तो निवडून आला तर आपल्याला अडचण निर्माण होईल असा प्रचार करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे रमिज मणियार निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर ज्यांना विरोध केला त्यांनाच पाठिंबा ही जाहीर केली. मणियार यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने प्रभागातील लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. याची चर्चा सुरू झाल्यानंतर नगरसेवक रमिज मणियार यांच्यावर चार बाऊन्सर घेऊन फिरण्याची वेळ आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर महायुतीचा प्रचंड विजय झाला. शिवसेना भाजप महायुतीचे एकूण 103 जागेवर निवडून आले. शिवसेना शिंदे गटाचे 53 भाजपने 50 जागांवर विजय मिळवला. त्यानंतर महापौरपदासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने त्यासाठी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. शिवसेना शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे चार बंडखोर देखील त्यांच्यासोबत आहे.
मात्र सर्वात आश्चर्य म्हणजे काँग्रेसचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नवनिर्वाचित नगरसेवक देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेने सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रमिज मणियार हे देखील शिंदे सोबत गेल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रभाग क्रमांक आठ अ मधून रमिज मनियार हे प्रचंड मताने निवडून आले. त्यांच्यासमोर भाजपचे पराग तेली हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते. पराग तेली आणि महायुतीच्या विरोधात रमिज मनियार यांनी जोरदार प्रचार केला होता.
मुस्लिम बहुल परिसर असल्याने लोकांनी एकत्र येऊन मणियार यांना मतदान केले. मनियार हे निवडून ही आले. आता मनियार यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांना मतदान केलेल्या मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मुस्लिम बहुल परिसरात मनियार यांच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे. ही गोष्ट पाहता मनियार यांनी आता आपल्याजवळ चार बाऊन्सर ठेवले आहे. हे बाऊन्सर घेऊन ते सध्या फिरत आहेत. आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त एका ठिकाणी आल्याने त्यांच्यासोबत चार बाऊन्सर दिसल्याने लोकांमध्ये एकच चर्चा रंगली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world