आज 16 डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर हे पहिलच हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्व नेत्यांची ओळख करुन दिली. त्यानंतर उदय सामंत यांनी पुरवण्या मागण्या सादर केल्या. वित्त मंत्री पुरवणी मागण्या सादर करत असतात. खातेवाटप न झाल्यामुळे सीएम यांनी सामंत यांना पुरवणी मागण्या सादर करायला सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनादरम्यानचा विधान भवनातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये वेद नावाचा एक चिमुरडा फडणवीसांसमोर हनुमान चालिसा म्हणून दाखवितो. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसदेखील त्याच्यासोबत हनुमान चालिसा म्हणत आहेत. चालिसा संपल्यानंतर तो फडणवीसांना जवळ बोलावून त्यांच्या कानात काहीतरी गुपित सांगतानाही दिसत आहे.
वेदने जुलै महिन्यातही विधानसभवनात देवेंद्र फडणवीसांसमोर शिवतांडव स्त्रोताचं पठण केलं होतं. साधारण तीन मिनिटं वेदने न अडखळता शिवतांडव