Nalasopara Crime: गर्भपाताच्या गोळ्यांचा काळाबाजार! रंगेहाथ पकडताच डॉक्टरने जे केलं; थेट FDA अधिकाऱ्यांनाच...

नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत शासकीय कामात अडथळा, सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि सामूहिक कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मनोज सातवी, प्रतिनिधी: 

Nalasopara Crime:  नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्यांचा काळाबाजार उघड झाला आहे. FDAने नालासोपाऱ्याच्या निर्मळ नाका परिसरात ‘गुरुकृपा' क्लिनिकवर छापा टाकत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कारवाईच्या वेळी आरोपी डॉक्टर कडून अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Pune News: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! दगडूशेठ गणपती मंदिराबाबत मोठा निर्णय; CM फडणवीसांची घोषणा

नालासोपाऱ्यात FDAची कारवाई! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नालासोपारा पश्चिमेतील निर्मळ नाका परिसरात बेकायदेशीररीत्या गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या एका BAMS डॉक्टरचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) छाप्यात उघडकीस आला आहे. शैलेश महाजन असे आरोपी डॉक्टरचे नाव असून, तो ‘गुरुकृपा' नावाचे क्लिनिक चालवत होता.

Advertisement

गोपनीय माहितीच्या आधारे औषध निरीक्षक सतीश चव्हाण यांनी छापा टाकला असता, आरोपी सर्रासपणे गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान आरोपीने अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत शासकीय कामात अडथळा, सरकारी आदेशाचे उल्लंघन आणि सामूहिक कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला 19 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास वळवी यांनी दिली आहे. या मोठ्या कारवाईने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

नक्की वाचा >> Pune News: हापूस, केशरही फिका पडेल, शेतकर्‍याने पिकवला कोकणलाही टक्कर देणारा 'हा' खास आंबा, राज्यभर चर्चा